मध्य प्रदेशात राजकीय भूकंप, 22 आमदारांचे राजीनामे

मंगळवार, 10 मार्च 2020 (18:20 IST)
ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि पदांचा राजीनामा दिल्यानंतर मध्य प्रदेशात राजकीय भूकंप झाला आहे. आत्तापर्यंत 22 आमदारांनी कमलनाथ यांची साथ सोडली आहे. कमलनाथ सरकार अल्पमतात आलं आहे. 
 
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस पक्ष सोडल्याचं आणि सगळ्या पदांचा राजीनामा दिल्याचं जाहीर केलं.
 
भाजपाकडे 107 आमदारांचं संख्याबळ आहे. 
 
भाजपा नेत्या यशोधरा शिंदे यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. दरम्यान ज्योतिरादित्य शिंदे भाजपात प्रवेश करणार की नवा पक्ष स्थापन करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती