कोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना आता झाला डेंग्यू

शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020 (11:47 IST)
पॉझिटिव्ह असलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Delhi Deputy CM Manish Sisodia) यांना आता डेंग्यू (dengue) झाला आहे. कोरोनाव्हायरसमुळे ऑक्सिजन आणि आता डेंग्यूमुळे त्यांचे ब्लड प्लेटलेट्स झपाट्याने कमी होऊ लागले आहेत. त्यांना आता दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
 
मनीष सिसोदिया यांना 14 सप्टेंबर रोजी कोरोनाची लागण झाली. त्यानंतर ते होम आयसोलेशनमध्ये होते. संसर्ग असल्याने ते 14 सप्टेंबर रोजी दिल्ली विधानसभेच्या एक दिवसीय सत्रात सहभागी होऊ शकले नाही. त्यानंतर त्याचा ताप आला आणि त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागली. त्यामुळे बुधवारी त्यांना दिल्लीतील लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
 
त्यांच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार आता त्यांना डेंग्यू झाला आहे आणि आता पुढील उपचारासाठी मॅक्स रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती