4G आहे बिहारमध्ये चमकी तापाचे कारण, ज्यामुळे 108 मुलांचा मृत्यू झाला

बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये मेंदू ज्वरामुळे 108 मुलांचा मृत्यू झाला आहे. मुजफ्फरपुरमध्ये चमकी तापासाठी 4जी ला कारणीभूत ठरवण्यात येत आहे.
 
मुजफ्फरपूरचे खासदार अजय निषाद यांनी विचित्र वक्तव्य दिले आहे. त्यांच्याप्रमाणे या तापाचं मुख्य कारण 4जी आहे. 4जी चं तात्पर्य गाव, गरीबी, गर्मी (उन्हाळा) आणि गंदगी (घाण) आहे.
 
यांच्याप्रमाणे मागासवर्गीय वर्गाचे मुलं या आजराला अधिक प्रमाणात बळी पडत आहे. त्यांच रहन-सहन निम्न स्तरीय आहे. उल्लेखनीय आहे की 400 हून अधिक मुलं चमकी तापामुळे रुग्णालयात भरती आहे.
 
दुसरीकडे मुजफ्फरपूर पोहचले बिहारच्या मुख्‍यमंत्री नीतीश कुमार यांना पीडित कुटुंबांचा विरोध झेलावा लागत आहे. नाराज लोकांनी नीतीश कुमार परत जा, नीतीश कुमार मुर्दाबाद असे नारे देखील लावले.
 
(फोटो : ट्‍विटर)

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती