केंद्राने केली ट्विटर खात्यांना बंद करण्याची शिफारस

मंगळवार, 13 ऑगस्ट 2019 (10:10 IST)
सध्या ३७० कलम रद्द झाल्याने सरकार मोठे पावले उचलत आहे. काश्मिर येथील स्थिती खराब होत असेल ती सुधारण्यासाठी योग्य ती पावले उचलली जात आहेत. त्यामुळे आता केंद्रीय गृह मंत्रालयानं जम्मू-काश्मीरमधल्या परिस्थितीसंदर्भात चुकीची माहिती देणं आणि अफवा पसरवणाऱ्या काही ट्विटर खात्यांना बंद करण्याची शिफारस केली असून, आठ जणांच्या ट्विटर अकाऊंट्सचा यामध्ये  समावेश आहे. 
 
या सर्व  खात्यांना बंद करण्याची शिफारस केली आहे. यामध्ये @kashmir787-Voice of Kashmir, @Red4Kashmir-MadihaShakil Khan, @arsched-Arshad Sharif, @mscully94-Mary Scully, @sageelaniii-Syed Ali Geelani, @sadaf2k19, @RiazKha61370907,  @RiazKha723 चा समावेश आहे.
 
जम्मू-काश्मीरमधून काही दिवसांपूर्वीच अनुच्छेद 370 काढले गेले होते.  त्यामुळे सोशल मीडियावर यासंदर्भात व्हायरल होणाऱ्या  व्हिडियो पासून सर्वच गोष्टींकडे सरकारनं लक्ष केंद्रित केले असून, घाटीमध्ये शांततेचं वातावरण राहील असे सरकार सर्व पाऊले उचलत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये काही संघटना दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत असल्याचीही माहितीही समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणांनीही हाय अलर्ट जारी केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती