राम माधव यांचे ट्विट I love pakistan

बुधवार, 7 फेब्रुवारी 2018 (10:45 IST)

धक्कादायक प्रकार घडला आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांचे ट्विटर अकाऊंट   हॅक झाले आहे. त्यांचे खाते हे तूर्किश आर्मी ग्रुप या हॅकर ग्रुपने हॅक केल्याची समोर आले आहे. तुर्किश आर्मी म्हणते की  अकाऊंटमधली सगळी माहिती आमच्याकडे गोळा केली आहे. त्यांचे अकाऊंट आम्ही हॅक केले असून या प्रकारचा  संदेश या ट्विटर अकाऊंटवर येतोय. त्याबरोबर  I love pakistan असे लिहून हे अकाऊंट आम्हीच हॅक केले आहे. तर त्यासोबत आय सपोर्ट तुर्की या नावाने देखील एक ट्विट आहे.  या ग्रुपकडून आता राम माधव यांच्या नावे टाकण्यात येत आहेत. तासाभरापूर्वीच एक रिट्विट राम माधव यांनी केल्याचे दिसते आहे त्यानंतरचे सगळे ट्विट मात्र तुर्किश आर्मी ग्रुपने पोस्ट केले आहेत. त्यामुळे आता सायबर सुरक्षा धोक्यात आली आहे.  @rammadhavbjpTC या ट्विटर हँडलच्या खाली असलेली लिंकही बदलण्यात आली आहे. भाजपा नेते राम माधव यांचे हे अधिकृत ट्विटर अकाऊंट होते ते काही वेळापूर्वीच हॅक करण्यात आले आहे. त्यामुळे मोठा प्रसंग निर्माण झाला असून  ट्विटर काय कारवाई करणार हे पहावे लागणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती