'तो' प्रस्ताव केंद्रातील मोदी सरकारनं फेटाळला

मंगळवार, 30 मार्च 2021 (20:24 IST)
मुंबईतील ज्येष्ठ नागरिक, अंध आणि दिव्यांग व्यक्तींना घरोघरी जाऊन कोरोनाची लस देण्याचा मुंबई महानगरपालिकेचा प्रस्ताव केंद्रातील मोदी सरकारनं फेटाळून लावला आहे. घरोघरी जाऊन लस देण्यासंदर्भात केंद्र सरकारचं कोणतंही धोरण अस्तित्वात नाही, असं महापालिकेला सांगण्यात आलं आहे. तर दुसरीकडे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सर्वांपर्यंत लस पोहोचण्यासाठी बूथ पद्धतीनं कोरोना लसीकरणाची मोहीम राबवली जाण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं. लस घेण्यासाठी लोकांना दोन किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास करावा लागू नये म्हणून बूथ पद्धतीची मोहीम राबवली जाण्यासंदर्भातील विधान केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केलं होतं. 
 
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त सचिव सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मुंबईमध्ये जवळपास दीड लाख लोकं असे आहेत जे अंथरुणाला खिळून आहेत किंवा दिव्यांग आहेत. या लोकांना लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रापर्यंत जाणं शक्य नाही. त्यामुळे अशांना घरी जाऊन लस देण्यासंदर्भात केंद्राकडे परवानगी मागितली होती. मात्र केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी केंद्राची असं कोणतही धोरण नाही असं सांगितलं आहे. परवानगी मिळाली असती तर या लोकांना नक्कीच फायदा झाला असता"
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती