थेट कोव्हिड सेंटरमध्ये गांजा आणि दारू पार्टी, व्हिडिओ व्हायरल

सोमवार, 29 मार्च 2021 (16:08 IST)
मुंबई डोंबिवलीमधील सावळाराम क्रीडा संकुलातील कोव्हिड सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांची रुग्णालयात गांजा आणि दारू पार्टी करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या संतापजनक कृत्याचा व्हिडिओ काढणाऱ्या तरुणालाही पार्टी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मारहान केली आहे. संबधित कोव्हिड सेंटर पालिका प्रशासनाने उभारले असले तरी, हे रुग्णालय खासगी डॉक्टरांच्या संस्थेमार्फत चालवण्यात येते. संबधित रुग्णालयात कर्मचाऱ्यांनी केलेले कृत्य अत्यंत चूकीचे आहे.  असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. ठेकेदाराने पार्टी करणाऱ्या तिन्ही कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती