सुशांतचे कुटुंब करणार संजय राऊतांवर मानहानीचा दावा

सोमवार, 10 ऑगस्ट 2020 (21:59 IST)
अभिनेता सुशांत सिंह राजपुत मृत्यू प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत असताना आता शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील या प्रकरणात उडी घेतली आहे. त्यांनी सुशांतचे वडिल के.के. सिंह यांनी दुसरं लग्न केल्यामुळे सुशांत आपल्या वडिलांवर नाराज होता असा दावा केला आहे.
 
मात्र यामुळे सुशांतचे कुटुंबियांनी संजय राऊत यांच्याविरोधात मानहानिचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे.
 
त्यांच्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केली नाहीत. असे खोटे आरोप करुन संजय राऊत या प्रकरणाची दिशा बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणत आहे. 
 
संजय राऊत यांनी सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यावरून मुंबई पोलिसांची स्तुती करत सुशांतच्या वडिलांबद्दल असे वक्तव्य केले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती