आदित्यविरोधी कारस्थानाची किंमत चुकवावी लागेल : संजय राऊत

गुरूवार, 6 ऑगस्ट 2020 (13:41 IST)
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात राज्याचे पर्यायवरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा संबंध नसल्याचे स्पष्टीकरण शिवसेनेने केले असले तरी त्यावरून आरोप-प्रत्यारोप अजून सुरूच आहेत. या सर्व आरोपांवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाष्य केले असून आदित्य यांच्याविरोधात राजकारण करणार्यांना इशारा दिला आहे.
 
आदित्य यांच्याविरोधात दळभद्री राजकारण सुरू आहे. या सगळ्या घटनेशी आदित्य यांचा काय संबंध आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात ठाकरे सरकारमुळे विरोधी पक्षातील नेते अस्वस्थ आहेत. हे सरकार अस्थिर करू शकले नाहीत या वैफल्यातूनच आदित्य यांच्यावर हे आरोप केले जात आहेत, असे ते म्हणाले आहेत. आदित्य ठाकरेंना पूर्ण महाराष्ट्र ओळखतो. ठाकरे कुटुंबातील ते एक महत्त्वाचा घटक आहेत. ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असे कोणतेही कृत्य त्यांच्याकडून होणार नाही, असे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती