कुत्र्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या विकृताला अटक

सोमवार, 26 ऑक्टोबर 2020 (16:32 IST)
मुंबईतल्या नेरुळ रेल्वे स्टेशन कॉम्पलेक्स परिसरातून कुत्र्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या एका विकृताला अटक करण्यात आली आहे. स्टेशन कॉम्पलेक्स परिसरात असणाऱ्या CCTV फुटेजमधून हा प्रकार समोर आला. त्यानंतर प्राणी हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते या प्रकाराच्या चौकशीची मागणी करत होते. 
 
या प्रकरणातील आरोपीलापोलिसांनी अटक केली. आठवडयाभरापूर्वी नेरुळ पश्चिमेला स्टेशनजवळ एका व्यक्ती कुत्र्याचे लैंगिक शोषण करत असल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. ‘हा व्हिडीओ पीएफए मुंबई युनिट दोनला मिळाला होता’ असे पीएफए कार्यकर्ते विजय रंगारे यांनी सांगितले. “मी आणि माझा सहकारी आदित्य पाटील घटनास्थळी गेलो व मुक्या प्राण्यावर क्रूर पद्धतीने अत्याचार करणाऱ्याचा शोध सुरु केला. आम्ही त्या संशियाताला शोधून काढले. ते दैनंदिन मजुरीवर काम करायचा व रात्री स्टेशन परिसरात झोपायचा” असे विजय रंगारे यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती