नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली

शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (08:49 IST)
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत नसल्याच्या घटना सतत घडत आहेत. मुंबई महापालिकेने रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी थुंकून घाण करणाऱ्या आणि मास्क न घालणाऱ्या ८ हजार नागरिकांकडून प्रत्येकी २०० रुपयांप्रमाणे १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली केली आहे. 
 
गेल्या १७ सप्टेंबर २०२० ते २ फेब्रुवारी २०२१ या १३९ दिवसांच्या कालावधीत ८ हजार ५२३ नागरिकांनी मास्क न घेतल्याने, रस्त्यावर कुठेही थुंकल्याने त्यांच्याकडून प्रत्येकी २०० रुपयांप्रमाणे १६ लाख ७४ हजार ७०० दंड वसूल केला आहे. कुर्ला, गोवंडी, चेंबूर या ठिकाणी रस्त्यावर थुंकणाऱ्या १,६२० लोकांवर कारवाई करत ३ लाख ९ हजार ४०० रुपये दंड वसुली करण्यात आली आहे. तसेच, मुलुंड, भांडुप व घाटकोपर येथे सर्वात कमी ९१६ जणांवर कारवाई करून १ लाख ७३ हजार ३०० रुपये एवढी दंड वसुली करण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती