मुंबई: रुग्ण संख्येत वाढ, साडेनऊ हजार इमारती प्रतिबंधित

मंगळवार, 22 सप्टेंबर 2020 (12:10 IST)
मुंबईतील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून येथे प्रतिबंधित इमारतींची संख्याही वाढू लागली आहे. मुंबईत सध्या तब्बल 9500 इमारती प्रतिबंधित आहेत. मध्यंतरी इमारत प्रतिबंध करण्याचे नियम शिथिल करण्यात आले होते आणि रुग्ण असलेला फ्लोर किंवा फ्लॅट प्रतिबंधित केले जात होते. मात्र पालिकेने पुन्हा नियमावलीत बदल केला आहे.
 
गेल्या 15 दिवसात प्रतिबंधित इमारतींची संख्या 3 हजाराने वाढली आहे. सध्या एकूण रुग्णांपैकी ८० टक्के इमारतीतील आहेत.
 
आताच्या नियमाप्रमाणे एखाद्या इमारतीत दहापेक्षा अधिक रुग्ण असल्यास किंवा दोन अथवा अधिक मजल्यांवर रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत टाळेबंद करण्याचे ठरविण्यात आले आहे. या कारणामुळेच संपूर्ण इमारती टाळेबंद होण्याचे प्रमाण वाढले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती