झोपडपट्टी परिसरात 57% टक्के मुंबईकर स्वबळावर कोरोनामुक्त झाले, विरोधकांनी केली टीका

गुरूवार, 30 जुलै 2020 (19:03 IST)
नीती आयोग आणि मुंबई पालिकेच्या 3 वार्डातील अँटीबॉडी सर्वेक्षणात झोपडपट्टीत 57 टक्के तर इमारतीमध्ये 16 टक्के जणांना कोरोना होऊन गेल्याचे उघड झालं तर खासगी लँबच्या सर्वेत सुमारे 25 टक्के लोकांना कोरोना होऊन गेलाय. 
 
सीरो सर्व्हेच्या रिपोर्टप्रमाणे झोपडपट्टी परिसरातील 57% लोकांमध्ये अँटिबॉडी आढळल्या. तर बिगर झोपडपट्टी परिसरात हे प्रमाण केवळ 16% आहे. सीरो रिपोर्टनुसार मुंबईची सध्याची परिस्थिती पाहता या भागात सामूहित प्रतिकारशक्ती शक्यता व्यक्त केली जाते. 
 
आता मुंबईकर स्वबळावर कोरोनामुक्त झाले म्हटल्यावर भाजपा नेते आणि माजी शिक्षण मंत्री आमदार अँड आशिष शेलार यांनी मग राज्य सरकार आणि महापालिकेनं केलं काय असा थेट सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारला केला आहे. त्यांनी आरोप केले मुंबई महापालिका व राज्य सरकारने केलेले दावे साफ खोटे आहेत. झोपडपट्टी परिसरातील सार्वजनिक शौचालयांचं निर्जंतुकीकरण केलं नाही. तसेच इमारतींचं निर्जंतुकीकरण केलं नाही. अशात ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली होती, किंवा जे मुंबईकर त्यासाठी आवश्यक उपाययोजना करीत होते, त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवली नाहीत. त्यांनी स्वबळावर कोरोनावर मात केली.
 
मुंबई महापालिकेने किमान 1 लाख मुंबईकरांची अँडीबॉडी टेस्ट कराव्यात ज्यातून सत्य परिस्थिती समोर येईल अशी मागणीही भाजपाने केली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती