धक्कादायक! मुंबईत डॉक्टर्स आणि पॅरा मेडिकलची इतकी पदं रिकामी

बुधवार, 23 सप्टेंबर 2020 (09:24 IST)
देशात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असून मुंबईची स्थिती भयावह आहे. राज्यात मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपट्याने वाढत आहे. अशात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे ज्यानुसार मुंबई महापालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43 टक्के पदं रिकामी असल्याची माहिती उघड झाली आहे. प्रजा फाऊंडेशनने या संदर्भात श्वेत पत्रिका प्रसिद्ध केली आहे.
 
आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला असून आता अव्यवस्था समोर येत आहे. 2018-19मध्ये आरोग्यवरचं 54 टक्के बजेट वापरलच गेलं नाही अशीही माहिती समोर आली आहे. 2018 च्या आकडेवारीनुसार रोज 28 कॅन्सरने, 29 मधुमेहाने तर 22 जणांचा श्वसनाच्या आजाराने मृत्यू होत असल्याचं आढळून आलं आहे. तसेच या आजारांसाठी पालिकेमध्ये ठोस धोरणाचा अभाव असल्याचंही उघडकीस आलं आहे.
 
या व्यतिरिक्त रुग्णसंख्या आणि मृत्यूदर वाढत असूनही महापालिकेने अद्याप व्हेंटिलेटर्सची खरेदी केली नसल्याचं उघड झालं आहे. व्हेंटिलेटर्सच्या खरेदीची प्रक्रिया लांबविली जात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती