अशावेळी येते आई आठवण तुझी

शुक्रवार, 8 मे 2020 (07:29 IST)
पोटात उसळला आगेचा डोंब, तहानेने जीव झाला व्याकुळ
अशावेळी येते आई आठवण तुझी !
 
चटका बसला साधा किंवा साधे खरचटले तरी
धाडकन पडून कधी हात-पाय मोडलातरी
अशावेळी येते आई आठवण तुझी !
 
एखादी दुखःद किनार किंवा एखादे अपयश
आनंदाचा क्षण परमोच्च अन् मिळालेले यश
अशावेळी येते आई आठवण तुझी !
 
कठीण असेल वेळ अन् प्रसंग असेल बाका
कधी कोणी मागत असेल मदतीच्या हाका
अशावेळी येते आई आठवण तुझी !
 
अविरत माया आणि निःस्सीम प्रेमाची अनुभूती
तुझ्या सारखी तूच एकमेव, गुण गाऊ किती?
अशा वेळी फक्त सांगेन हीच आई माझी !!
 
खरे सांगू आई, हाक मार कधीही, जागेपणी वा स्वप्नी
तुझ्यासाठी सदैव तत्पर तुझे हर्ष-मनी !!
 
प्रत्येक आईला मातृत्वदिनाच्या शुभेच्छा !

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती