Recipes Grilled Cheese Sandwich: क्रिस्पी ग्रील्ड चीज सँडविच बनवण्यासाठी या टिप्स फॉलो करा

सोमवार, 7 ऑगस्ट 2023 (21:18 IST)
Recipes Grilled Cheese Sandwich: सँडविच बहुतेक घरांमध्ये नाश्त्यात खाल्ले जातात.सॅन्डविच सर्वांना खूप आवडतात. सॅन्डविच टोमॅटो आणि कांद्याच्या साहाय्याने बनवतात. तर चीझ ग्रिल्ड सॅन्डविच देखील 
सर्वांना आवडतात. ग्रील चीझ सॅन्डविच क्रिस्पी असेल तर सॅन्डविच खाण्याची चव अनेक पटीने वाढते. क्रिस्पी ग्रीड चीझ सॅन्डविच कसे करायचे हे जाणून घ्या .
 
ब्रेड वर बटर लावा -
बटर ब्रेडला खमंग करण्यासाठी खूप मदत करते. बरेच लोक पॅनवर बटर लावतात  आणि नंतर सँडविच बेक करतात. बटर ब्रेडवर लावा. असे केल्याने लोणी ब्रेडच्या थेट संपर्कात येते, ज्यामुळे ते अधिक कुरकुरीत आणि चविष्ट बनते.
 
चीझचा योग्य वापर करा-
कुरकुरीत आणि चविष्ट ग्रील्ड सँडविच बनवण्यासाठी, आपण चीझ योग्य प्रकारे वापरणे फार महत्वाचे आहे. जर तुम्ही चीझ स्लाइस वापरत असाल तर लक्षात ठेवा की ते पातळ असले पाहिजेत जेणेकरून ते व्यवस्थित वितळेल आणि यामुळे ब्रेड देखील कुरकुरीत होईल. दुसरीकडे, हवे असल्यास, चीजच्या स्लाइसऐवजी ते किसून देखील वापरता येते. यामुळे ब्रेडवर चीझ समान प्रमाणात पसरवणे सोपे होते आणि नंतर सँडविच अधिक कुरकुरीत होते.
 
मंद गॅसवर करा-
ग्रील्ड सँडविच कुरकुरीत बनवण्‍यासाठी स्लो कुकिंग खूप मदत करू  शकते. मध्यम ते मंद आचेवर ब्रेड चांगले शेकून घ्या. असे केल्याने, चीज हळूहळू वितळते. एवढेच नाही तर ब्रेड न जळता कुरकुरीत होते.
 
या टिपचे अनुसरण करा-
एकदा तुम्ही तुमचे चीज सँडविच ग्रिल केले की, कापून सर्व्ह करण्यापूर्वी एक किंवा दोन मिनिटे तसेच ठेवा. असे केल्याने चीझ जास्त प्रमाणात बाहेर पडण्यापासून रोखण्यास मदत होते. यामुळे तुमचे सँडविच असेच कुरकुरीत राहते.
 







Edited by - Priya Dixit  
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती