Rangpanchmi Special : पोह्यांपासून बनणारी चविष्ट रेसिपी जाणून घ्या

गुरूवार, 14 मार्च 2024 (19:30 IST)
होळी, रंगपंचमी सण येत आहे. या सणांना लोक घरी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गोड आणि नमकीन बनवतात. जर तुम्हाला पण असेच काही खास आणि चविष्ट बनवायचे असेल तर पोहे है एक चांगला पर्याय आहे. पोह्यांपासून बनणारी ही रेसिपी जाणून घ्या. 
 
साहित्य- 
2 कप पाताळ पोहे 
1/4 कप शेंगदाणे 
1/4 कप काजू
1 चमचा पीठी साखर 
1/4 चमचा हळद पाउडर
चवीनुसार मीठ 
1/4 कप भजलेलेली हरबरा दाळ 
10-15 कढीपत्ता 
2 मोठे चमचे तेल 
 
कृती- 
एका कढईमध्ये तेल टाकून गरम करावे. मग यामध्ये पोहे टाकावे .पोहे कुरकुरित होइपर्यंत भाजावे. पोहे भाजले गेल्यानंतर एका ताटात काढावे. आता परत या कढईमध्ये तेल टाकावे. तेल गरम झाल्यानंतर त्यात शेंगदाणे भाजून घ्यावे. तसेच काजू देखील भाजून घ्यावे. आता कढईमध्ये भाजलेली हरभरा दाळ टाकावी. व 10 ते 15 कढीपत्ता टाकावा. मग यानंतर  हळद आणि पीठी साखर टाकावी. मग नंतर यात पोहे, शेंगदाणे, काजू टाकावे. व चवीनुसार मीठ टाकावे. व तयार आहे रंगपंचमी स्पेशल पोह्यांपासून बनवलेले नमकीन याला हवा बंद डब्ब्यात ठेवावे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती