किचन हॅक्स- इलेक्ट्रिक केतली स्वच्छ कशी करावी

बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (09:33 IST)
सध्या पाणी गरम करण्यासाठी इलेक्ट्रिक केतली वापरण्यात येत आहे. केवळ पाणीच गरम करायला नव्हे तर केतलीचा वापर इतर अनेक गोष्टी गरम करण्यासाठी देखील करत आहे. ह्याला स्वच्छ करण्यासाठी बरेच लोक सामान्य भांड्यांसारखे धुऊन घेतात. पण असं केल्यानं इलेक्ट्रिकल केतली खराब होऊ शकते. हे काही टिप्स आहे ज्यांना अवलंबवून आपण हे स्वच्छ करू शकता या मुळे ही केतली दीर्घकाळापर्यंत वापरण्यात येईल. ह्याला स्वच्छ करण्याची पद्धत सोपी आहे आणि वेळ देखील कमी लागतो. चला तर मग जाणून घेऊ या काय आहेत त्या टिप्स. 
 
1  वास निघण्यासाठी  लिंबाने स्वच्छ करा- 
 
लिंबाने स्वच्छ करण्यासाठी केतलीत पाणी भरून ठेवून त्यात चिरलेले लिंबू घाला. नंतर पाणी उकळून घ्या आणि 10 -15 मिनिटे गरम पाणी तसेच राहू द्या .आता हे पाणी फेकून द्या असं केल्यानं त्यामधील वास निघून जाईल.  
 
2 व्हिनेगरने स्वच्छ करा- 
आपण वास निघण्यासाठी लिंबाच्या ऐवजी 1 मोठा चमचा व्हिनेगर घाला.नंतर केतली पाण्याने भरून द्या .पाणी उकळवून घ्या. 10 मिनिटे पाणी तसेच राहू द्या. नंतर पाणी फेकून द्या. असं केल्यानं केतलीतील येणारा वास निघून जाईल. 
 
3 नवी चकाकी येण्यासाठी -
जर आपल्या केतलीत काही जमून बसले आहे आणि साधारणपणे स्वच्छ केल्याने देखील स्वच्छ होत नाही तर आपल्याला बेकिंग सोडा वापरायला पाहिजे. बेकिंग सोड्यात एक्सफॉलिएटिंग गुणधर्म असतात. आपण 1 लहान चमचा बेकिंग सोडा आणि 1 मोठा चमचा पाणी मिसळून इलेक्ट्रिक केतली वर टाकून ठेवा आणि 15 मिनिटा नंतर स्क्रबरने केतली स्वच्छ करता तर ही स्वच्छ होऊन नवीन दिसू लागते

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती