चविष्ट अंडी बिर्याणी

बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (19:44 IST)
साहित्य -
6 अंडी, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, 1 कांदा बारीक चिरलेला, 4-5 लवंगा, 1/4 चमचा काली मिरपूड, 1-2 तमालपत्र, 1/2 इंच तुकडे दालचिनी, जिरे, बिर्याणी मसाला, शिजवलेला भात, तिखट, गरम मसाला, मीठ, कोथिंबीर, तेल
 
कृती -
सर्वप्रथम अंडी उकळवून घ्या तुकडे करा एका पॅनमध्ये थोडंसं तेल आणि लाल तिखट आणि चिमूटभर मीठ घालून परतून घ्या. नंतर एका ताटलीत काढून ठेवा.  
सादा तांदूळ आणि बासमती तांदूळ जी इच्छा असल्यास धुऊन अर्धा तास आधी भिजत ठेवा. मीठ घालून शिजवून घ्या. 1 चमचा तेल किंवा तुपात भात शिजवून घ्या. भात तयार झाल्यावर एका पॅनमध्ये काढून त्यावर काळीमिरपूड घाला. आता एका पॅनमध्ये तेल घालून मोहरी, जिरा, आलं-लसूण पेस्ट तमालपत्र, दालचिनी, लवंग, कांदा घालून तपकिरी रंगाचे होई पर्यंत परतून घ्या. त्यामध्ये 2 चमचे बिर्याणी मसाला, गरम मसाला, तिखट, मीठ घाला आणि मंद आचेवर शिजवा.
 
आता या मध्ये फ्राईड अंडी घाला आणि चांगल्या प्रकारे मिसळा. आता या मधून अर्धे मिश्रण एका ताटलीत काढून घ्या आणि अर्ध्या मिश्रणात शिजवलेला भात घालून ढवळा. नंतर उरलेले मिश्रण मिसळून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. मंद आचेवर एक वाफ घ्या. वरून कोथिंबिरीने सजवा.अंडी बिर्याणी खाण्यासाठी तयार आणि गरम सर्व्ह करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती