वर्किंग वुमन्ससाठी वास्तू टिप्स

आज स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. घर सांभाळून त्या बाहेर पडतात आणि तिथेही तेवढ्यात मनापासून कामात सहभागी होतात. तरी अनेकदा खूप कष्ट करूनही काही महिलांना अपेक्षित यश हाती लागत नाही. अश्या महिलांसाठी आम्ही सांगत आहोत अश्या काही सोप्या वास्तू टिप्स ज्याने त्या करिअरमध्ये उंची गाठू शकतात.
* ऑफिसचे काम करताना पाय क्रॉस करून बसू नये.
* आपण काम करत असाल तो टेबल गोल नसावा. टेबल चौकोनी असल्यास उत्तम.
* आपल्या टेबलवर लहान क्रिस्टल्स ठेवावे.
* टेबलवर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जसे कॉम्प्युटर, टेलिफोन हे दक्षिण-पूर्व दिशेला ठेवाव्या.
* टेबलचा वरील भाग काचेचा किंवा लाकडाचा असावा.
* पुढे वाढायचे असेल तर ऑफिसमध्ये आपण बसत असाल ती खुर्ची उंच असावी.
* उत्तर-पूर्व करिअरची दिशा असल्याने या दिशेला पाण्याचा किंवा फुलांचा फोटो लावावा.
* वर्क फ्रॉम होम करत असाल तर बेडरूममध्ये बसून काम करू नये.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती