Vastu Tips : घरासाठी योग्य लाकडाची निवड

घराच्या बांधकामात विविध जातीच्या लाकडाचा वापर करण्यात येतो. परंतु, ही लाकडेही आपल्या जीवनात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण करत असतात. काही वास्तुशास्त्राच्या ग्रंथांत बाभळीचे लाकूड अशुभ मानले जाते. मात्र, बाभळीचे लाकूड अधिक टणक असल्याने त्याला ग्राह्य मानले आहे. तसेच काटे व ज्या झाडातून दूधासारखा द्रव पदार्थ निघतो अशा झाडाचे लाकूड वापरले जात नाही.

वड, पिंपळ आदी झाडाच्या लाकडाचा घर बांधणीत वापर केला जात नाही. मुख्य प्रवेशद्वार हे एकाच जातीच्या लाकडापासून तयार केले पाहिजे. हाच नियम घरात लावण्यात येणार्‍या खिडक्या व इतर दरवाजांनाही लागू पडतो. ज्या नक्षत्रात आपला जन्म झाला आहे त्याच्याशी संबंधित वृक्ष आपल्याला शुभ वृक्ष आहे. तोच कल्पवृक्ष बनून आपल्याला सुखशांती प्रदान करत असते.

वास्तुशास्त्रानुसार घराच्या पश्चिम दिशेला पिंपळाचे झाड असणे शुभ मानले जाते. बेल, नारळ, आवळा, तुलशी व चमेली आदी झाडे सर्व दिशाना शुभ आहेत काही झाडे विशिष्ट दिशाना लावली पाहिजेत. -
1. जांभूळ - दक्षिण-पूर्व-उत्तर.
2. केळी- तुळशीसोबत सर्व दिशाना.
3. वड- केवळ पूर्व दिशेला.
4. कडूलिंब- वायव्य-आग्नेय.
5. डाळींब- आग्नेय-नैऋत्य दिशेला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती