सौभाग्यशाली आहे मोरपंखी झाड

अनेक लोकं घरात सजावटीसाठी झाडं लावतात. घरात साज-सज्जा केल्याने शोभा वाढते परंतू ही सज्जा वास्तूप्रमाणे असली तर सजावटीसह भाग्यदेखील उजळू शकतं. वास्तू शास्त्राप्रमाणे घरात मोरपंखी झाड लावल्याने अनेक समस्यांपासून सुटकारा होतो.
 
हे झाड जोड्याने लावल्याने सौभाग्यात वृद्धी होते. मोरपंखी झाडं घरात सुख आणि समृद्धी प्रदान करतं. म्हणून हे वाळायला नको याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
 
या झाडाने सर्व प्रकाराचे वास्तू दोष दूर होतात आणि आर्थिक लाभासाठी हे झाड मुख्य दाराच्या बाजूला अमोर-समोर असे ठेवावे. हे आपल्याला वाईट नजरेपासून वाचवतं. या झाडामुळे घरात येणार असलेल्या विपत्तीला प्रवेश मिळत नाही.
 
हे झाड औषधी गुणांनी भरपूर आहे. म्हणून आपल्या घरात हे झाड लावल्याने आजारापासून मुक्ती मिळते. रोग प्रतिरोधक गुणधर्म असल्यामुळे याने तेल निर्मित केलं जातं. याच्या प्रभावाने कुटुंबातील लोकांचे आरोग्य निरोगी राहील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती