प्राण घातक जिवाणूंपासून संरक्षण करतील हे सोपे उपाय

बुधवार, 16 सप्टेंबर 2020 (09:28 IST)
हवन -यज्ञ ही आपली जुनी परंपरा आहे. शुद्धीकरणाचा हा एक प्रभावी उपाय आहे. हवनामध्ये तयार होणाऱ्या औषधीयुक्त धुरात जिवाणूंचा नायनाट करण्याची क्षमता असते. हे वातावरणाला शुद्ध करतं आणि आपल्यात सकारात्मक ऊर्जेचा संचार करतं. असे मानले जाते की हवनाच्या औषधी धुराचा परिणाम तब्बल 30 दिवसापर्यंत असतो. 
 
घरात किंवा एखाद्या संस्थेमधील असलेल्या वास्तू दोषाला दूर करण्यासाठी हवन हे प्रभावी उपाय आहे. अग्नी हे यज्ञाचे आराध्य देव आहे. अग्नी हे ईश्वरस्वरूपी आहे. जेथे अग्नी असतं तेथे प्रकाश पसरतो. हवन यज्ञ केल्याने देव प्रसन्न होतात. 
 
वास्तू शास्त्रानुसार घरात किंवा संस्थेत दररोज सकाळ संध्याकाळ धुप लावल्याने वास्तू दोष दूर होतो. 
घरात दररोज सकाळ-संध्याकाळ कापूर लावल्याने ताण तणाव दूर राहत. रात्री झोपण्याचा पूर्वी पितळ्याच्या भांड्यात तुपात भिजवलेला कापूर पेटवावा.
 
अग्निहोत्र सुवास किंवा गुळाची धूप आणि तूप एका गवऱ्यावर टाकून पेटवल्याने गृह कलह होतं नाही. घरात गुग्गुळाची धुपकांडी पेटविल्याने शांतता येते. 
 
घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी पिवळ्या मोहरीचे दाणे पेटवावे. 
गुग्गुळाची धुपकांडी पेटविल्याने आजारांचा नायनाट होतो. 
घरात कच्च्या कडुलिंबाच्या पानांचे धूर पेटवा. या मुळे हानिकारक जंतांचा नायनाट होतो. आणि वास्तू दोष देखील दूर होतो. 
 
धूप, आरती, दिवा,पूजेची अग्नी यांना कधीही तोंडाने फुंकर मारून विझवू नये.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती