या 9 चुकांमुळे घरातील बरकत नष्ट होते

शनिवार, 5 सप्टेंबर 2020 (08:19 IST)
1. कचरापेटीच्या स्वच्छतेचा प्रभाव आमच्या आर्थिक जीवनावर पडत असतो. वास्तू नियमानुसार घराच्या उत्तर पूर्व अर्थात ईशान कोपर्‍यात कचरा ठेवू नये. येथे घाण असल्याने धनाचा नाश होतो.
 
2. वास्तुनुसार नळातून पाणी गळत राहणे योग्य नाही. याने आर्थिक नुकसानाला सामोरा जावं लागतं. हे धन हळू-हळू खर्च होत असल्याचे संकेत आहे. 
 
3. घरात स्वयंपाकघर आग्नेय कोण (दक्षिण-पूर्व) दिशेला असावं. पश्चिम दिशेला स्वयंपाकघर असल्याने धन येतं खरं पण खर्च होतं अर्थात बरकत नष्ट होते.
 
4. घराची उत्तर-पूर्व दिशा अगदी सपाट असली पाहिजे. वास्तू नियमानुसार घराचा उतार उत्तर पूर्वीकडे अधिक असल्यास धन येण्यात अडथळे निर्माण होतात आणि कमाई पेक्षा अधिक पैसा खर्च होतो.
 
5. वास्तू नियमानुसार शयनकक्षाच्या प्रवेश दारासमोर असलेल्या भिंतीच्या डाव्या कोपऱ्याला धातूची वस्तू लटकवून ठेवावी. हे स्थान भाग्य आणि संपत्तीचं आहे. या दिशेत भिंतीला क्रॅक असल्यास दुरुस्त करणे योग्य ठरेल. या दिशेत तडा गेलेल्या वस्तू आर्थिक नुकसानाचे कारण ठरेल.
 
6. घराचा उत्तर पश्चिम भाग उंच असावा. कारण या भागात उतार असल्यास बरकत नसते. अर्थात घरातील उत्तर पूर्वी भागात उतार पाहिजे आणि पाण्याचा निचरा या बाजूस असावा.
 
7. घरातील तिजोरीचा प्रभाव आर्थिक जीवनावर पडत असून तिजोरी दक्षिण दिशेच्या भिंतीला चिकटून या प्रकारे ठेवावी ज्याने मुख उत्तर दिशेकडे उघडेल. तसेच पूर्वीकडे अलमारी उघडत असल्यास धन वृद्धी होते तरी उत्तर दिशा उत्तम मानली गेली आहे. 
 
8. घरात तुटक्या-फुटक्या वस्तू नसाव्या. तुटलेला पलंग, आरसा, घड्याळ इतर आर्थिक नुकसानाचे संकेत असल्याचे दर्शवतं.
 
9. घरात असलेल्या पायर्‍यांच्या खाली कचरा किंवा अनावश्यक वस्तू जमा करून ठेवू नये.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती