होळी आणि थंडगार श्रीखंडाचा बेत .............

सोमवार, 2 मार्च 2020 (19:33 IST)
साहित्य :- 1 किलो ताजे दही, 1 किलो साखर, अर्धा चमचा वेलची पूड, अर्धा चमचा जायफळाची पूड, बेदाणे,काजू तुकडी, आख्रोडचे तुकडे , केशरी रंग(रंग येण्यापुरती),चारोळ्या,
 
कृती :- सर्वप्रथम ताजे दही घेऊन एका मऊ कापड्यात घट्ट बांधून त्याला रात्रभर लटकवून ठेवावे. सकाळी त्या दह्याला एका पातेल्यात काढावे .काढल्यावर त्यात साखर मिसळावी. पुरणयंत्रात किंवा पुरणयंत्र नसल्यास बारीक मैदा चाळणीने चाळून घेणे. तयार मिश्रणात 2 -4 चमचे दुधात केशरी रंग घालून मिश्रण एकजीव करावे. ह्यात वेलचीपूड, जायफळ उगाळून किंवा पूड टाकावी, बेदाणे, काजूची तुकडी, आख्रोडचे तुकडे घालून थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये पातेले ठेवावे आणि पुरी सोबत थंडगार श्रीखंड सर्व्ह करावे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती