थंडाई नसेल तर होळीची मजा काय, जाणून घ्या सोपी विधी

शनिवार, 29 फेब्रुवारी 2020 (12:32 IST)
होळी म्हणजे उत्साहाचा, रंगाचा आणि स्वाद घेण्याचा सण. होळीच्या दिवशी होळी खेळल्यावर थंडाई पिण्याची मजा काही वेगळीच असते. थंडाई आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर ठरते. थंडाई तयार करण्याची सोपी विधी जाणून घ्या
 
साहित्य: 50 ग्राम बदाम, खसखस 50 ग्राम, साखर 1 किलो, दूध अर्धा लीटर, वेलदोडे 10 ग्राम, काळी मिरी 10 ग्राम, टरबूज- खरबुजाच्या बिया 25 ग्राम, गुलाब पाणी 100 मिली (आवडीप्रमाणे), केवडा पाणी 25 एमएल (आवडीप्रमाणे).
 
कृती: सर्वात आधी बदामाची पूड तयार करा. त्याचप्रमाणे खसखस, वेलदोडे, बिया मिक्सरमध्ये वाटून घ्या. आता मिक्सरमध्ये सर्व सामुग्री टाकून दूध वाढवत मिश्रण फिरवा. मिश्रणावर फे आल्यासारखा दिसल्यावर ते मिश्रण एका सुती फडक्यातून गाळून घ्या. नंतर साखर मिसळून सरबत प्रमाणे खालीवर करा.  नंतर केवडा आणि गुलाब पाणी आवडीप्रमाणे मिसळून गार करा. थंड झाल्यावर पाहुण्यांना सर्व्ह करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती