उन्हामुळे टॅनिग झाली असल्यास हे घरगुती उपाय अवलंबवा

शुक्रवार, 26 मार्च 2021 (09:00 IST)
उन्ह्यामुळे बऱ्याच लोकांना टॅनिग होते. या साठी काही घरगुती उपाय करून आपण टॅनिग दूर करू शकता. चला तर मग जाणून घेऊ या काय आहे ते उपाय. 
 
1 लिंबाचा रस- लिंबू त्वचेवरील काळपटपणा दूर करतो. त्वचा गोरी बनवतो. या साठी लिंबाचा रस काढून त्याचे साल त्वचेवर घासा आणि 10 मिनिटे तसेच ठेवा. नंतर पाण्याने धुवून घ्या. असं दररोज केल्याने त्या भागाची टॅनिंग नाहीशी होईल. 
 
2 काकडी,लिंबू आणि गुलाबपाणी - काकडी किसून,त्यात लिंबाचा रस आणि गुलाब पाणी मिसळून टॅनिगच्या ठिकाणी लावा नंतर काही वेळ स्क्रब करून पाण्याने धुवून घ्या. असं दररोज केल्याने टॅनिंग दूर होईल. 
 
3 हरभराडाळीचे पीठ आणि हळद- चेहऱ्याच्या टॅनिग साठी हरभराडाळीचे पीठ , गुलाबपाणी,दूध,आणि हळद,मिसळून पेस्ट बनवून लावा आणि  20 मिनिटे तसेच ठेवा. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. टॅनिग नाहीशी होऊन चेहरा उजाळेल.   
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती