स्टीलच्या भांड्यांवरील गंज घालवण्यासाठी हे उपाय करून बघा

सोमवार, 28 सप्टेंबर 2020 (11:30 IST)
सध्याच्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बरेच जण घरातूनच काम करीत आहे. खरं तर कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बऱ्याच कंपन्यांनी घरातून काम करण्याची संकल्पना राबविली आहे. त्यामुळे लोकं घरातूनच काम करीत आहे. घरात असल्यामुळे घराची स्वच्छता करणं देखील त्याचा हाती आले आहे. घरातील वस्तू देखील स्वच्छ करण्यासाठी त्यांच्याकडे आता भरपूर वेळ आहे. 
 
स्टीलचा वस्तू स्वच्छ करताना काही समस्यांना सामोरी जावं लागत. बऱ्याच वेळा असे आढळून आले आहे की स्टीलची भांडी किंवा स्टीलचा रॅक मध्ये गंज चढला ते स्वच्छ करणं अवघड काम असतं. आणि गंजाचे डाग कसे दूर करता येईल हा प्रश्न उद्भवतो. पण आता स्टीलच्या भांड्यांवरील गंजाचे डाग सहजरीत्या घालवू शकतो. या साठी काही उपाय करून वस्तू स्वच्छ आणि चकचकीत करू शकतो. 
 
पहिले उपाय -
बेकिंग सोडा : साहित्य - 1 चमचा बेकिंग सोडा, 2 कप पाणी, 1 स्वच्छ सुती कापड, 1 दात घासण्याचा ब्रश, 
कृती - एका भांड्यात दोन कप पाणी घेऊन त्यात एक चमचा बेकिंग सोडा मिसळून घोळ तयार करा. आता स्टीलच्या ज्या वस्तूला गंजाचे डाग लागले असल्यास त्या बेकिंग सोड्याच्या घोळात ब्रश बुडवून गंज लागलेल्या जागेवर घासा. या पद्धतीने गंज लागलेल्या जागेवर बेकिंग सोड्याचे पाणी लावल्यास वस्तू चकचकीत आणि स्वच्छ होईल. आणि गंजाचे डाग देखील जातील. एखाद्या स्टीलच्या रॅक स्वच्छ करावयाचे असल्यास आणि गंज जास्त प्रमाणावर असल्यास त्या जागेवर बेकिंग सोडा टाका आणि त्यावर थोडं पाणी शिंपडावे. आता टूथब्रशच्या साहाय्याने गंज लागलेला भाग घासून घ्या. आता एका सुती कपड्याला त्या पाण्यात बुडवून पिळून त्याने गंज स्वच्छ करा. गंज लगेच निघेल. आता रॅक कोरड्या फडक्याने पुसून घ्या. जेणे करून पुन्हा गंज लागणार नाही. आणि वस्तू स्वच्छ दिसेल आणि चकचकीत राहील.
 
दुसरे उपाय -
व्हिनेगर : स्टीलच्या वस्तूला अधिक प्रमाणात गंज लागले असल्यास गंजलेल्या त्या भागावर व्हिनेगर टाका आणि त्यावर थोडं पाणी शिंपडावे. टूथब्रशच्या साहाय्याने गंज लागलेला भाग घासून घ्या. सुती कपड्याला व्हिनेगर च्या पाण्यात बुडवून घ्या. आणि त्याने गंज लागलेला स्टीलचा भाग पुसून घ्या. नंतर कोरड्या कपड्याने स्टीलचे भांडे किंवा रॅक घासून घ्या. रॅक आणि भांडी स्वच्छ आणि चकचकीत होणार.
 
तिसरे उपाय - 
लिंबू आणि बेकिंग सोडा : स्टीलच्या गंज लागलेल्या भागावर बेकिंग सोडा टाका आणि त्यावर लिंबू पिळून त्यावर पाणी शिंपडावे. टूथब्रशच्या साह्याने घासून स्वच्छ करा. नंतर बेकिंग सोडा आणि लिंबू पिळून ठेवलेल्या पाण्यात सुती कापड बुडवून घट्ट पिळून पुसून घ्या. नंतर कोरड्या कपड्याने कोरडे करून घ्या. वस्तू स्वच्छ होईल आणि गंजाचे डाग निघून जातील वस्तू चकचकीत होणार. हे उपाय केले तर स्टील च्या वस्तूला दीर्घकाळा पर्यंत गंज लागणार नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती