भिंतीवरील तेलाचे डाग बघून चिडू नका, हे करून बघा

शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020 (08:19 IST)
भिंतीवर तेलाचे डाग चांगले दिसत नाही. घराच्या भिंतीवर तेल अनेक प्रकारे लागू शकतं. उदाहरणार्थ, आपल्या शरीराबाहेरचे तेल सहजपणे आपल्या भिंतीवर लागतं. किंवा आपल्या हातावरील तेल चुकून भिंतीवर लागतं. या व्यतिरिक्त स्वयंपाक करताना देखील तेल भिंतीवर लागतं, जेणे करून भिंती घाण दिसू लागतात. इथे समस्या अशी आहे की भिंतीवरून तेलाचे डाग काढणे कठीण होतं. हे सामान्य साबण किंवा पाण्याच्या साहाय्याने स्वच्छ केले जाऊ शकतं नाही. परंतु आपल्याला काळजी करण्याची गरज नाही आज आम्ही आपल्याला भिंतीवरून तेलाचे डाग काढण्याचे काही सोपे उपाय सांगत आहोत.
 
पांढरे व्हिनेगर - 
बऱ्याच लोकांनी आपल्या अनुभवांनी सांगितले आहेत की भिंतीवरील तेलाचे डाग स्वच्छ करण्यासाठी पांढरे व्हिनेगर प्रभावी आहेत. याचा वापर करण्यासाठी एका स्पंजामध्ये पांढरे व्हिनेगर बुडवा आणि त्याला पिळून घ्या आणि हलके ओले असल्यावरच डाग पडलेल्या भिंतीवर तो पर्यंत घासत राहा जो पर्यंत तेलाचे डाग स्वच्छ होतं नाही. ही पद्धत आपल्या भिंतींना स्वच्छ करण्यासाठी आणि तेलाचे डाग काढण्यासाठी मदत करेल. भिंतीवरील व्हिनेगर काढण्यासाठी एका स्वच्छ स्पॉन्ज ओले करून भिंतींना पुसा नंतर कोरड्या कपड्याने पुसून घ्या.
 
कॉर्नस्टार्च - 
पाणी आणि कॉर्नस्टार्च च्या साहाय्याने पेस्ट बनवून भिंती स्वच्छ करू शकता. पाण्यात तीन चमचे कॉर्नस्टार्च घाला. पेस्टला डाग लागलेल्या भिंती वर पसरवा आणि पेस्टला काही मिनिटांसाठी तसेच सोडा. मऊ कपड्याने पेस्ट पुसून टाका. तेलाचे डाग निघेपर्यंत ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा करा.
 
उष्णता - 
आपल्याला हे ऐकायला विचित्र वाटेल, पण उष्णता देऊन देखील भिंतीवरील तेलाचे डाग काढता येऊ शकतात. या साठी आपण प्रेस किंवा आयरन लो सेटिंग वर ठेवा. आणि थोड्यावेळासाठी प्रीहीट करा. आता आपण भिंतीवर काही कागदी टॉवेल्स दुमडून ठेवा. आणि दुसऱ्या हाताने त्यावर प्रेस फिरवा. आपल्या भिंतीवरील डाग काढण्यासाठी प्रेस पुन्हा पुन्हा फिरवावी. लक्षात असू द्या की प्रेस आपल्याला थेट भिंतीवर वापरायची नाही. तसेच ह्याचा वापर करताना सावधगिरी बाळगा. प्रेस भिंतीवरील तेलाला गरम करेल आणि पेपर टॉवेल ते तेल शोषून घेईल. ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा डाग स्वच्छ होई पर्यंत करा. शेवटी भिंतीला गरम साबण्याच्या पाण्याने धुऊन घ्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती