काय सांगता,सोशल मीडिया पासून दूर राहतात हैप्पी कपल्स

सोमवार, 1 मार्च 2021 (20:37 IST)
सुखी वैवाहिक जीवन सर्वांनाच आवडते आणि लोक आपल्या वैवाहिक जीवनाला सुखी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. 
आजकाल सगळे सोशल मीडियावर आपल्या आयुष्याचे सुख दुःख सामायिक करतात.आपले फोटो सामायिक करतात. जास्त वेळ सोशल मीडियावर घालवतात.परंतु एका संशोधनात आढळून आले आहे की हैप्पी कपल किंवा सुखी आणि आनंदी जोडपे असे काही करत नाही ते एकमेकांसह वेळ घालवणे जास्त पसंत करतात. चला कारण जाणून घेऊ या की हैप्पी कपल सोशल मीडियावर जास्त वेळ का घालवत नाही.
 
1 त्यांना सोशल मीडियावर मिळणाऱ्या लाईक्स आवडत नाही-
बरीच जोडपे आपल्या खासगी क्षणाच्या फोटोंना किंवा कुठेतरी जाण्याचे फोटो सोशल मीडियावर सामायिक करतात.अशा लोकांना त्या फोटो साठी किती लाईक्स किंवा कॉमेंट आले ह्याची काळजी असते. परंतु आनंदी जोडपं सोशल मीडिया प्रोफाइल वर आपल्या सर्व काही अपडेट करत नाही त्यांना मिळणाऱ्या लाईक्स किंवा कॉमेंट्सची काळजी नसते.त्यांना आवडत नाही की लोकांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल काही बोलावं. 
 
2 कोणाशीही तुलना करत नाही-  
असे लोकं किंवा जोडपे आपल्या जीवनाची तुलना इतर लोकांशी करत नाही. दुसरे आपल्या आयुष्यात किती आनंदी आहे असं विचार करणे खूप सोपं आहे परंतु आपल्याला त्यांच्या खासगी आयुष्या बद्दल काहीच माहित नसते. म्हणून कोणाच्या आनंदी फोटोला बघूनअसा विचार करू नका की समोरचा किती आनंदी आहे. सुखी आणि आनंदी जोडपं फक्त आपल्या नात्यात आनंदी असतात. ते कोणाशी देखील तुलना करत नाही.
 
3 एकट्यात भांडतात -
हॅप्पी कपल किंवा सुखी जोडपे लोकांसमोर न भांडता एकट्यात भांडतात. जेणे करून त्यांचे भांडण कोणा समोर कळू नये.ते एकमेकांशी बोलून आपले मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करतात. 
 
4 विशेष क्षणात जगण्यावर विश्वास ठेवतात  -
सुखी जोडपं आपल्या जोडीदारासह सोशल मीडियावर फोटो पोस्ट करण्या ऐवजी त्यांच्या सह आनंदात क्षण घालविण्यात विश्वास ठेवतात. कुठे जाऊन चेक इन करण्यापेक्षा जोडीदारासह घालविणे पसंत करतात.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती