प्रेम म्हणजे काय?

शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (11:02 IST)
प्रेम म्हणजे अंतरीचा श्र्वास,
प्रेम म्हणजे एकेकांवरचा विश्र्वास
 
प्रेम म्हणजे नातंची गुंफण,
प्रेम म्हणजे एकमेकांची आठवण
 
प्रेम म्हणजे भेटण्याची आस,
प्रेम म्हणजे दोघंही एकेकांना खास
 
प्रेम म्हणजे झुरणं, एकमेकांना जीव लावणं,
प्रसंगी एकमेकासाठी जीवाला जीव देणं
 
प्रेम म्हणजे भेटण्यासाठी आतुर होणं,
एकमेकासाठी एकमेकांनं रीतं होणं
 
प्रेम म्हणजे रुसणं, फुगणं, एकमेकांशी भांडणं,
दोघांनीही एकमेकांना सावरून घेणं
 
प्रेम म्हणजे दोघांनीही एकमेकांना समजून घेणं
प्रेम म्हणजे एकमेकांनी एकमेकात एकरूप होणं
 डॉ. शिवाजी शिंदे  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती