पंचतंत्रची कहाणी : जादुचे पातेले

गुरूवार, 29 फेब्रुवारी 2024 (20:30 IST)
अनेक वर्षांपूर्वी पीतल नगरीत किशन नावाचा एक शेतकरी राहत होता. गावातील जमींदाराच्या शेतात काम तो काम करून आपले घर चलवायचा. तसेच पाहिले किशनचे शेत होते पण त्याचे वडील आजारी पडल्यामुळे त्याला आपले सर्व शेत विकावे लागले. रोज केलेल्या कामामुळे जे पण पैसे मिळायचे ते सर्व आजारपणाला आणि घरखर्चाला लगायचे. पण ते देखील कमी पडायचे. नेहमी तो विचार करायचा की कसे घरची आर्थिक परिस्थिति सुधारली जाईल. आज देखील किशन हाच विचार करून जमींदारच्या शेतात काम करण्यासाठी सकाळीच घरातून बाहेर पडला. 
 
जमीन खोदतांना त्याची कुदळ एका धातुला लागली व त्याचा आवाज आला. किशन स्वात:शीस बोलला की हे काय आहे? त्याने लागलीच तेथील भाग खोदण्यास सुरवात केली. व तिथुन एक मोठे पातेले बाहेर आले. पातेले  पाहून किशन दुःखी झाला. व त्याने विचार केला की चला आता जेवण करून घेऊ किशनने जेवणाला जाण्याकरिता हातातील कुदळ त्या पातेल्यात फेकले आणि हात धुवून तो जेवण करू लागला. मग काही वेळानंतर जेवण झाल्या नंतर किशन कुदळ घेण्यासाठी त्या पात्राकडे गेला. पातेल्याजवळ गेल्यावर किशन आश्चर्यचकित झाला. त्या पातेल्यात एक नाही तर अनेक कुदळ होते. आता हा सर्व प्रकार पाहून किशन आनंदित झाला व ते जादुचे पातेले  घेऊन तो घरी आला. 
 
आता किशन प्रत्येक दिवशी एक एक अवजार त्या जादुच्या पातेल्यात टाकू लागला व ते अवजार एकाचे अनेक व्हायचे व तो ते अवजार बाजारात जउन विकू लागला. असे केल्यामुळे किशनच्या घरची परिस्थिती चांगली व्हायला लागली. अशा पद्धतीने त्याने पुष्कळ पैसे कमावले. एक दिवस किशनने काही दागिने विकत घेतले व त्या पातेल्यात टाकले. ते दागिने देखील अनेक झाला. या प्रकारे किशन हळू हळू श्रीमंत व्हायला लागला. आणि जमींदराच्या सावकराकडे मजुरी करणे सोडून दिले. किशनला श्रीमंत होतांना पाहून सावकर मोहन याला संशय आला. तो सळल किशनच्या घरी गेला. तिथे जावून त्याला जादुच्या पातेल्याबद्द्ल समजले. तेव्हा सावकर किशनला म्हणाला की, तू हे पातेले कोणाच्या घरुन चोरलेस? घाबरलेल्या आवाजात किशन म्हणाला की, मालक मला हे पातेले शेतात काम करत असतांना मिळाले. मी कोणाच्या घरी चोरी केली नाही. मग सावकर म्हणाला की जर हे पातेले माझ्या शेतात मिळाले तर हे माझे आहे. किशनने जादुचे पातेले घेऊन जाऊ नका म्हणून खूप विनंती केली. पण सावकाराने त्याचे काहीच ऐकले नाही. व आपल्यासोबत ते पातेले घेऊन गेला. सावकारने देखील त्यात एक एक वस्तु टाकून त्या वाढवायला सुरवात केली. व सावकर देखील खूप श्रीमंत झाला एक दिवस सवकारने त्यात आपले सर्व दागिने टाकून दिलेत व त्या रात्रीतुनच तो श्रीमंत झाला. 
 
अचानक सावकर श्रीमंत झाल्याची बातमी राजापर्यंत पोहचली. या बतमीचा पत्ता लावण्यासाठी राजाने आपल्या सेवकांना त्या सवकारच्या घरी पाठवले. मग राजाला त्या जादुच्या पातेल्याबद्द्ल समजले. राजाने लागलीच ते जादुचे पातेले राजमहलात मागुन घेतले. राजमहलात ते पातेले येताच राजाने आपल्या आजूबाजूच्या वस्तु त्या पातेल्यात टाकायला सुरवात केली. सामानाला वाढतांना पाहून राजा आश्चर्यचकित झाला. असे करता करता राजा स्वताच त्या पातेल्यात जउन बसला व त्या पातेल्यातून अनेक राजा बाहेर आलेत .पातेल्यातून निघालेला प्रत्येक राजा म्हणायला लागला की, मीच पीतल नगरीचा राजा आहे. असे बोलता बोलता सर्व राजा एकमेकांशी लढायला लागले आणि लढता लढता तिथेच मरण पावले. आणि त्यांच्या भांडणात ते पातेले देखील तुटून गेले. 
 
जादुच्या पातेल्यामुळे राजमहलात झालेल्या या भयानक लढाईबद्द्ल नागरित सर्वांना समजले. ही बातमी कळताच मजूर किशन आणि सावकार मोहन यांनी विचार केला की चांगले झाले आपण त्या जादुच्या पातेल्याचा उपयोग व्यवस्थित केला. राजाने मूर्खपणामुळे आपला जीव गमावला. 
 
तात्पर्य- 1. मूर्खपणचा शेवट हा वाईट होतो. 2. कुठल्याही सामानाचा उपयोग व्यवस्थित करावा नाहीतर घातक ठरू शकतो. 

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती