चल रे भोपळ्या टुणुक टुणुक

मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020 (11:10 IST)
ही गोष्ट आहे एका म्हातारीचीची, एका गावात एक म्हातारी राहत होती. तिला एकच मुलगी होती त्या मुलीचे लग्न झाले होते आणि ती दुसऱ्या गावात दिली होती. ती म्हातारी फार अशक्त होती तिला काही दिवस आरामासाठी आपल्या लेकीकडे जायचे होते. आपल्या लेकीशी भेट घेण्यासाठी तिला जंगलातून जायचे होते. ती हळू-हळू काठी टेकत टेकत आपल्या लेकीला भेटायला निघाली. 
 
वाटेत जंगलात शिरतातच तिला एक अस्वल भेटले. त्या अस्वलाने तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर तिने त्या अस्वलाला थांबवले आणि म्हणाली की थांब... बघ माझ्याकडे मी तर आत्ता फार अशक्त आहे आणि आत्ता आपल्या लेकीकडे जात आहे. काही दिवस तिथेच राहीन, भरपूर खाईन, धडधाकट होईन मग परत येताना तू मला खा, जेणे करून तुझे पोट तरी भरेल. अस्वलाला तिचे म्हणणे पटले तिने त्या म्हातारीला सोडले.
 
काठी टेकत टेकत ती म्हातारी पुढे निघाली तेवढ्यात बघते तर काय ! अरे देवा तिचा समोर एक सिंह उभा आणि तो म्हातारीला खाणार तेवढ्यात ती म्हातारी त्याला म्हणे की अरे -मला बघ मी किती अशक्त आहे. मी आपल्या लेकी कडे जात आहे तिथे भरपूर खाईन लठ्ठ होईन मग तू मला खा म्हणजे तुझे पोट तरी भरेल. सिंहाला तिचे म्हणणे पटले आणि त्याने म्हातारीला जाऊ दिले. 
 
ती आपल्या लेकीच्या घरी सुखरूप पोहोचली. तिच्या लेकीने तिच्या साठी चांगले-चांगले पक्वान्न तयार करून ठेवले होते. तिला खूप भूक लागली होती. तिने जेवण केले आणि काही महिने तिथेच राहिली. नंतर तिला तिच्या घराला यायचे होते पण येणार कसे वाटेत तर सिंह आणि अस्वल वाट बघत असणार, असा विचार करून तिला एक युक्ती सुचली. तिने आपल्या लेकीच्या शेतातून एक मोठा भोपळा मागवला आणि त्या भोपळ्यात हात आणि पाय जाण्या एवढी जागा केली आणि त्या भोपळ्यात बसून जंगलाच्या वाटेला निघाली. भोपळ्यात बसलेली असल्यामुळे सिंह आणि अस्वल तिला ओळखू शकले नाही अशा प्रकारे ती आपल्या घरी सुखरूप आली. अखेर तिच्या युक्तीनेच तिचे प्राण वाचवले आणि सिंह आणि अस्वल तिची वाटच बघत राहिले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती