Kids Story पैशाचं झाड

गुरूवार, 29 ऑक्टोबर 2020 (12:53 IST)
ही गोष्ट आहे बबलू ची जो कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागलेल्या लॉक डाऊन मुळे कंटाळला होता. सुरुवातीचा काळ त्याला आवडायचा पण नंतर नंतर तो देखील कंटाळला होता. दररोज काय करावे त्याला काहीच सुचत नव्हते, कोणाकडे जाता येतं नव्हत. कोणी खेळायला नाही. तो फार चिडचिड करायचा पण त्याला आपल्या या समस्याला दूर करण्याचा सोपा उपाय मिळाला होता. 
 
तो गोष्टींच्या पुस्तक वाचायचा आणि त्याचा घराच्या मागे असलेल्या बागेत जाऊन तासंतास झाडांशी गप्पा करायचा. त्यांना पाणी घालायचा त्यावरील लागलेल्या फुलांना बघून त्याला फार आनंद वाटायचा. काही झाड असे होते की त्यांच्यावर फळ लागलेले होते आणि ते फळांनी बहरलेले होते. त्याने आईला विचारले की आई आपल्या झाडावर किती फळ लागलेले आहेत. त्याचा आईने उत्तरले की होय, बाळ आपण त्यांना खत-पाणी देतो म्हणून ते वाढतात. 
 
त्याने आपल्या गोष्टींच्या पुस्तकात वाचले होते की एका परिकथेत परीच्या वरदानामुळे एका मुलांच्या घरी पैश्याचे झाड लागले आणि त्यामुळे तो श्रीमंत झाला. त्याचा डोक्यात सतत तीच कहाणी फिरत असे. त्याने विचार केला की आपण देखील पैश्याचे झाड लावावे. जेणे करून आपल्या कडे देखील खूप पैसे येतील आणि आपण देखील श्रीमंत होऊ. त्याला हे माहीत असे की त्याचे बाबा पैसे कमविण्यासाठी खूप मेहनत करतात. त्याने विचार केला की माझ्याकडे जी पैसे जमा करण्याची गुल्लक आहे जर त्याला आपण जमिनीत पुरून देऊ आणि दररोज त्याला पाणी घालू तर ते पैसे देखील वाढतील. 
 
असा विचार करतं तो एके दिवशी तो आपली गुल्लक एका प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवतो जेणे करून त्यामधील पैसे ओले होऊ नये. गुल्लक घेऊन एक जागेला खणत त्या मध्ये दडवून पुरून देतो आणि दररोज त्याला पाणी घालतो. असे करता-करता त्याला 10 -15 दिवस होतात. तरी ही त्याला त्यामधून झाड येताना दिसतच नाही म्हणून तो त्याची आई निजलेली असताना बागेत जाऊन खणलेल्या खड्ड्याला उचकून बघतो तर काय, त्याची गुल्लक तिथे नाही. तो फार घाबरतो आणि सगळी कडे शोधाशोध करतो पण त्याला त्याची गुल्लक कुठेही सापडत नाही. त्याला फार रडायला येतं. तेवढ्यात तो बघतो की त्याची आई तिथे येते आणि त्याला तू इथे काय करतं आहेस असे विचारते. तो आईला घडलेले सर्व सांगतो. त्यावर त्याची आई त्याला समजावते की बाळ असे पैशांचे झाड येतं नसत, त्यासाठी कष्ट करावे लागतात. 
 
झाड्यांच्या फळांना विकून पैशे कमावता येतात पण असे गुल्लक मातीत पुरून पैश्याचे झाड येतं नसत. त्या साठी कष्ट करूनच पैसे कमावावे लागतात आणि हो तुझी गुल्लक मीच काढून घेतली होती. जेणे करून इतर कोणी ती काढून न घे. त्यावर तो आईला म्हणतो की पण त्या परीने तर त्या गोष्टीमध्ये पैश्याचे झाड लावले ज्यामुळे त्या गरीब मुलाला पैसे मिळून तो श्रीमंत झाला. म्हणून मी पण असे करून बघितले. असे ऐकून त्याची आई हसली आणि तिने त्याला समजावले की बाळ त्या सगळ्या काल्पनिक गोष्टी असतात. ज्या निव्वळ तुमच्या मनोरंजनासाठी असतात. आणि जर आपल्याला खरचं जास्त पैसे मिळवायचे असेल तर त्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागणार. बबलूला आई ने सांगितलेले समजले आणि त्याने आईला कष्ट करण्याचे वचन दिले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती