पोपट त्याला बॉस म्हणतात

शनिवार, 28 जुलै 2018 (15:23 IST)
एकदा एक माणूस पोपट विकत घ्यायला दुकानात जातो, तो दुकानदाराला एका पोपटाची किंमत विचारतो 
 
दुकानदार : ५०० रुपये 
ग्राहक: एवढा महाग, का? 
 
दुकानदार: हो, याला वर्ड, एक्सेल, पावर पॉंइंट सर्व येत. 
ग्राहक: अरे वा !! आणि हा दुसरा?
 
दुकानदार : याची, किंमत १००० याला वर्ड, एक्सेल, पावर पॉंइंट तर येतंच, शिवाय प्रोग्रामिंग सुद्धा करता येत.

ग्राहक: वा वा !!! आणि हा जो झोपलेला आहे तो?
दुकानदार : त्याची किंमत ५००० आहे.
 
ग्राहक:आणि त्याला काय येत?
दुकानदार : त्याला काय येत माहित नाही, मी त्याल काही करताना पाहिलं पण नाही, पण हे दोन्ही पोपट त्याला बॉस म्हणतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती