पावसाळ्यासाठी केसवर्धक तेल

पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळणार्‍या माका, ब्राह्मी, नागरमोथा या सारख्या वनस्पती उकळून तयार केलेले तेल अतिशय उत्तम असते.
केसवर्धक तेल कसे तयार करावे? 
माका, ब्राह्मी यांची पानं सम प्रमाणात घेऊन ती बारीक करावी. त्यात त्या लाद्याच्या चारपट पाणी घालून ते जाड बुडाच्या पातेल्यात घालावे. त्या लाद्याच्या समप्रमाणात तेल घालावे. ते मिश्रण गॅसवर ठेवून संपूर्ण पाणी आटून तेल राहीलपर्यंत उकळावे. थंड झाल्यावर गाळून ते केसांना मसाज करण्यासाठी वापरावे. या तेलाने केस वाढतात, गळणे बंद होते, पांढरे होण्याची प्रक्रिया कमी होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती