आयुर्वेदामुळे कोरोना विषाणू पासून वाचता येऊ शकतं

बुधवार, 25 नोव्हेंबर 2020 (15:20 IST)
सध्याच्या काळात सगळी कडे कोरोनाने उच्छाद मांडला आहे. लोक या पासून वाचण्यासाठी योग आणि आयुर्वेद उपचारपद्धतीचा अवलंब करीत आहे. या साठी ते आयुष्यमान काढा देखील पीत आहेत. किंवा ते घरातच काढा बनवत आहे. पण असे देखील ऐकण्यात आले आहे की या काढ्याला जास्त प्रमाणात घेतल्यानं पोटात आणि छातीत जळजळचा त्रास होत आहे. म्हणून योग्य प्रमाणातच काढा घ्यावा. कोरोनाच्या भीतीपोटी दररोज काढा प्यायल्याने नुकसान देखील होऊ शकतात. बरेच लोक या तीन वस्तुंना वापरून आयुर्वेदिक उपाय करत आहेत. सध्याच्या काळात लोक घरगुती उपाय करीत आहेत पण हे कितपत योग्य आहे हे जाणून घेणं देखील गरजेचं आहे. 
 
मनाने काहीही उपाय करणे अजिबात योग्य नाही. जर आपल्याला कोणत्या प्रकाराची समस्या असल्यास, आणि हा त्रास अधिक वाढेल या पूर्वीच आपण आयुर्वेदिक, एलोपेथिक किंवा होमिओपॅथिक चिकित्सकांशी संपर्क करू शकता. घरगुती उपाय करू नये. आयुष मंत्रालयाने काढा पिण्याचा सल्ला दिला आहे. या साठी आयुष मंत्रालयाने एक मार्गदर्शक सूचना देखील जारी केली आहे, पण आपल्याला हे जाणून घेणं जरुरी आहे की काढा कधी आणि किती प्रमाणात घ्यावा. 
 
लोकांना घरात तुळशीची पाने - 4, दालचिनी - 2 तुकडे, सुंठ- 2 तुकडे, काळी मिरी 1, मनुके- 4 या सर्वांना मिसळून एक काढा तयार करा. काढा बनविण्यासाठी या सर्व जिन्नस एकत्ररित्या पाण्यात उकळवून, गाळून या पाण्याचे सेवन दिवसातून एकदा तरी करण्याचा सल्ला दिला जात आहे. हे देखील सांगितले जात आहे की कोरडा खोकला असल्यास किंवा घशात सूज आल्यावर दिवसातून एक किंवा दोन वेळा पुदिन्याचे ताजे पान ओव्यांसह घेऊ शकता. 
 
घशात खवखव असल्यास दिवसातून दोन किंवा तीन वेळा साखरांसह किंवा मद्यासह लवंगाची भुकटी देखील घेऊ शकता. पण या संदर्भात आयुर्वेद तज्ज्ञाचा सल्ला आवर्जून घ्यावा. 
 
सर्दी-पडसे पासून बचाव करण्यासाठी लोकप्रिय असा या आयुर्वेदिक काढा घेण्याचा सल्ला देखील लोक देत आहे. 2 चमचे मध आणि अर्धा चमचा आल्याच्या रसात चमचा भर काळीमिरपूड मिसळून सकाळ, संध्याकाळ आणि रात्री घेतल्यानं सर्दी, पडसे आणि कफ आणि इतर संक्रमणापासून वाचता येऊ शकतं. पण आपल्याला हे जाणून घेणं महत्त्वाचे आहे की आपल्या काय झाले आहे आणि आपण हे उपाय कशासाठी करत आहात. हे आयुर्वेदिक उपाय खूप प्रभावी आहे पण याचा सेवन वेळेवर आणि कमी मात्रेत करावयाचे असतं. याचे अतिसेवन केल्यानं हे शरीरात उष्णता वाढवत. जर हिवाळाच हंगाम असल्यास तर हे फार कमी प्रमाणात घेऊन सर्दी पडसे पासून वाचता येऊ शकतं.
 
आयुर्वेदानुसार, आलं, काळीमिरी आणि मध असे औषध आहे की हे तिन्ही खराब होण्या सारखे नाही. आलं वाळल्यावर सुंठ बनून जातं. काळी मिरी देखील वर्षानुवर्षे खराब होत नाही आणि मध ते तर कधीच सडत नाही हे हजारो वर्षांपर्यंत देखील खराब होत नसतं. 
 
या तिन्हीमधे काय आहे :
काळ्या मिरीत पिपेरीन नावाचा रसायन असतं जे संसर्गाच्या प्रसार कमी करण्याव्यतिरिक्त इतर रोगात देखील फायदेशीर आहे. अशाच  प्रकारे मधात देखील आवश्यक पोषक घटक, खनिजे आणि व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात आढळतात. अशा प्रकारे आल्यात व्हिटॅमिन बी 6 असत आणि हे पोषक घटक आणि बायोएक्टिव यौगिकांसह भरलेले असतं. आल्यात शक्तिशाली अँटी ऑक्सिडंट असतात जी लिपिड पेराक्सीडेशन आणि डीएनएच्या नुकसानाला टाळते. विशेष म्हणजे की कर्क रोग विरोधी औषध बीटा एलिमेन आल्यापासून बनवतात. 

अशाच प्रकारे मधात फ्रॅकटोज आढळतं या शिवाय या मध्ये कार्बोहायड्रेट, रायबोफ्लॅविन, नायसिन, व्हिटॅमिन बी 6 व्हिटॅमिन सी आणि अमिनो ऍसिड आढळतात. 
 
एक चमचा (21 ग्रॅम) मधात सुमारे 64 कॅलरी आणि 17 ग्रॅम साखर (फ्रॅकटोज, ग्लूकोज, सुक्रोज आणि माल्टोज) असतात. मधात अँटी बेक्टेरियल आणि अँटीसेप्टिकचे गुणधर्म आढळतात ज्या मुळे जखमा भरण्यात येण्यात किंवा हे दुखापती मध्ये आराम मिळविण्यासाठी खूप प्रभावी आहे.
 
खबरदारी - या तिन्ही वस्तू उष्ण प्रकृतीच्या असतात, म्हणून उष्ण प्रकृती असणाऱ्यांना याचा अधिक सेवन करणं टाळावे. हे तिन्ही पदार्थ कधीही खराब होत नाही. आणि हे रोग प्रतिकारक क्षमता वाढविण्यात मदत करतात, ज्या मुळे आपले शरीर रोगांविरुद्ध लढू शकेल. पण या आयुर्वेदिक उपायाला घेण्यापूर्वी एखाद्या तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती