वजन वेगाने कमी करण्यास मदत मिळते, आयुर्वेदिक काढा, केवळ 3 वस्तूंची गरज

शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020 (16:18 IST)
वजन कमी करण्यासाठी आपण काय काय प्रयत्न करीत नाही पण कधी कधी असे घडते की वजन कमी करण्यासाठी डायटिंग आणि हेवी वर्कआउट करण्याचे दुष्परिणाम सुरू होतात. जेणेकरून आपली रोग प्रतिकारक क्षमतेवर त्याचा परिणाम होतो.
 
आज आम्ही आपल्याला असे आयुर्वेदिक काढ्यांबद्दल सांगत आहोत, जे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. विशेषतः कोरोना व्हायरसच्या आजारापासून वाचविण्यासाठी प्रभावी आहे. चला तर मग जाणून घेऊया कसे बनवायचे या काढ्याला. 
 
तीन गोष्टींनी मिळून बनेल हा काढा. या मध्ये दालचिनी, काळीमिरी आणि आलं हे साहित्य वापरतात. हे तिन्ही पचन सुधारण्यासाठी चांगले मानले जातात. 
 
दालचिनी शरीरात कॅलरीजच्या बिघाडामध्ये सुधारणा करण्यास मदत करते. तर आलं रोग प्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करतं आणि हंगामी बदलमुळे होणाऱ्या कमी जास्त लक्षणाशी लढण्यास मदत करतं. 
 
या तीन गोष्टींची गरज लागणार - 
दालचिनी - 1 कांडी, 
काळी मिरी पावडर - चिमूटभर, 
आलं - 1/2 चमचा किसलेलं
 
मेटाबॉलिज्म (चयापचय) ला बळकट करणारा असा हा आयुर्वेदिक काढा - 
एका भांड्यात पाणी चांगल्या प्रकारे उकळून घ्या. नंतर त्यात सर्व साहित्य घालून द्या आणि उकळू द्या. आपला आयुर्वेदिक काढा तयार. 
उत्तम परिणामासाठी दिवसातून दोन वेळा घेऊ शकता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती