बर्फाच्या पाण्याचे सेवन करत असाल तर सावधान!

शुक्रवार, 15 मार्च 2019 (12:10 IST)
उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी आपण सगळेच थंड पाणी पितो अथवा बर्फ टाकून पाणी पितो, मात्र अधिक थंड पाणी प्यायल्यामुळे पचनास त्रास होतो. यामुळे अनेक आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होतात. 
 
थंड पाण्यामुळे नसा आखडतात. यामुळे पचनाची क्रिया संथ होते आणि बद्धकोष्ठता, गॅस यांसारख्या समस्या निर्माण होतात. 
 
उन्हाळ्यात बाहेरचे तापमान अधिक असते. यात थंड पाणी प्यायल्यास छातीत कफ जमा होऊ लागतो. थंड पाणी प्यायल्यानंतर शरीराचे तापमान मेंटेन करण्यासाठी शरीराला मोठय़ा प्रमाणात एनर्जी खर्च करावी लागते. याचा परिणाम पचनसंस्थेवर होतो. 
 
थंड पाण्यामुळे नसा संकुचित होतात. यामुळे हृदयाला ब्लड पंप करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. यामुळे हार्ट बीट संथगतीने होतात. 
 
थंड पाणी प्यायल्याने प्रतिकारक क्षमता कमी होते. यामुळे अँलर्जी तसेच आजारांची भीती वाटते. 
 
थंड पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान अचानक बदलते. ज्याचा परिणाम डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती