Coronavirus Time: प्रतिकारशक्ती वाढविण्याचे 5 खास उपाय

शुक्रवार, 9 एप्रिल 2021 (09:54 IST)
कोरोना व्हायरस आजरात प्रतिकारकर शक्ती वाढवणे महत्त्वाचे आहे हे सर्वांना कळून आलं आहे. कोरोना घातक असलं तरी संर्सागापासून अनेक जीव वाचले देखील आहे. बचावासाठी सामाजिक अंतर पाळणे अंत्यंत आवश्यक आहे. या व्यतिरिक्त आम्ही आपल्याला 5 उपयांबद्दल सांगत आहोत- 
 
1. उपास : एक दिवसचा संपूर्ण उपास आमच्या शरीरात विषाणू व विषारी तत्त्व बाहेर काढण्यात मदत करतं. याने प्रतिकारक शक्ती वाढते. जर आपण व्यस्कर नसाल तर या दरम्यान नारळ पाणी व बाल हरड याचे सेवन करा. बाल हरड चोखावी याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात. ज्यांना उपास सहन होत नाही त्यांनी हा उपाय टाळावा.
 
2. पौष्टिक आहार : सूर्यास्तापूर्वी भोजन ग्रहण करुन घ्यावे. याने पचन क्रिया सुरळीत राहते. संध्याकाळनंतर आहार शिळा व दूषित होण्याची प्रक्रिया सुरु होते. योग्य आहार घेणे सुरक्षा की हमी देतं. आहारासकट तुळशीचा रस, त्रिकूट काढा व मुलैडीचे सेवन करावे. ताज्या भाज्या भरपूर प्रमाणात सेवन कराव्या. सोबतच काळेमिरे, काळं मीठ, लिंबू, ओवा, मेथीदाणा, आलं हे खाद्य पदार्थांमध्ये वापरावं.
 
या व्यतिरिक्त दूध, दही, तुप, लोणी, मध, शहतूत, हिरव्या पाले भाज्या, नारळ, खडी साखर, खीर, पंचामृत, तांदूळ सात्विक पदार्थ खावे. आहार रसदार, किंचित वंगण आणि पौष्टिक असणे आवश्यक आहे. यात धान्य, डेअरी प्रॉडक्ट्स, फळं, सुखे मेवे यांचा समावेश असावा. व्हि‍टॅमिन सी घेणे देखील आवश्यक आहे. योग्य आहाराने इम्यून सिस्टम मजबूत होतं.
 
3. मालीश : घर्षण, दंडन, थपकी, कंपन व संधी प्रसारण या प्रकारे मालीश करावी. याने स्नायूं मजबूत होतात. रक्त संचार सुधारतं. याने ताण कमी येतो, डिप्रेशन दूर होतं. शरीरात चमक येते. रक्त संचार योग्य असल्यास आजार होण्याची शक्यता नाहीशी होते.
 
4. प्राणायाम : अंग-संचालन किंवा सूर्य नमस्कार करत आपण यात अनुलोम-विलोम प्राणायाम देखील जोडू शकता याने आपल्या आपले अंतर्गत अवयव आणि सूक्ष्म नाड्या शुद्ध होतील. प्राणायाम अन्न पचायला मदत करत असताना, याने शरीराची विषारी द्रव्ये बाहेर टाकून रोगप्रतिकार शक्ती वाढवते. प्राचीन आयुर्वेदातील ऋषी सांगतात की वनामुळे वायु, वायुमुळे आयु प्राप्त होते. जर आपल्या घराच्या जवळपास चांगले वृक्ष नसतील तर रोपं लावावे. शरीरात वायुला शुद्ध करण्यासाठी प्राणायामाला आपल्या सवयीत सामील करावे. याने शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढते.
 
5. शुद्ध हवा आणि पाण्याचे सेवन : सकाळी लवकर उठून फिरायला जावे. दररोज किमान 40 मिनिट फिरणे आरोग्यासाठी उत्तम आहे. नियमित चालणार्‍यांचा स्टेमिना वाढतो व त्यांच्यावर साथीच्या रोगाचा परिणाम जास्त किंवा घातक होत नाही. बाहरे निघणे योग्य वाटत नसल्यास घराच्या अंगणात ‍किंवा गच्चीवर चकरा लावाव्या. तसेच पुरेशी झोप घेतल्याने देखील इम्युनिटी वाढते. अनिद्रा, भीती, ताण यामुळे इम्युनिटी कमी होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती