केळीच्या सालांचे फायदे जाणून घ्या

गुरूवार, 10 जून 2021 (09:00 IST)
वजन कमी करण्यास वजन वाढविण्यासाठी केळीचा वापर केला जातो.य यामध्ये व्हिटॅमिन,खनिजे,प्रथिने,अँटी फंगल,फायबर इत्यादी पोषक घटकांचा समावेश आहे. आपल्याला हे जाणून आश्चर्य होणार की केळी सारखेच त्याचे साल देखील फायदेशीर आहे.चला तर मग जाणून घेऊ या.
 
बरीच लोक केळी खाऊन त्याची सालं फेकून देतात पण आम्ही जे फायदे आपल्याला सांगणार आहोत त्यामुळे आपण केळीचे सालं फेकणार नाही.
 
1 एका अभ्यासानुसार दररोज 2 केळीचे सालं 3 दिवस खाल्ल्याने  शरीरात सेरोटोनिन हार्मोनचे प्रमाण 15 टक्क्यांनी वाढते. तसेच मूड चांगला ठेवण्यास मदत करते.
 
2 केळीच्या सालामध्ये ट्रिप्टोफेन नावाचा घटक असतो, ज्यामुळे आपल्याला निवांत झोप येण्यास मदत मिळते.
 
3 केळीच्या सालामध्ये केळींपेक्षा फायबरचे प्रमाण जास्त असतात. जे शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात. जेणे करून लठ्ठपणा देखील कमी होतो.
 
4 केळीच्या सालामध्ये ल्यूटिन नावाचा घटक असतो, जो डोळ्यांची दृष्टी वाढविण्यास मदत करतो.
 
 
5 केळीचे साल शरीरातील लाल रक्त पेशींना तुटण्यापासून रोखतो. परंतु पिवळ्या सालांपेक्षा हिरवे साल जास्त फायदेशीर आहे.
 
6 केळीचे साल त्वचेसाठी फायदेशीर आहे.हे चेहऱ्यावरील मुरूम मस,सुरकुत्या,दाद काढून टाकण्यास मदत करते.
 
7 केळीचे साल रक्त स्वच्छ करण्यात आणि बद्धकोष्ठता कमी करण्यात देखील मदत करतात.
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती