उष्णतेपासून बचाव होण्यासाठी अवलंबवा या 10 टिप्स

बुधवार, 20 मार्च 2024 (07:30 IST)
उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. एप्रिल, मे, जून मध्ये खूप उन्हाळा असतो. अनेक लोकांना उष्णता सहन होत नाही. तसेच डिहाइड्रेशन झाल्यामुळे अनेक प्रकरच्या समस्या निर्माण होतात. जसकी उल्टी होणे, चक्कर येणे, किडनी मध्ये समस्या, डायरिया होणे इतर. चला तर जाणून घेऊ या उष्णतेपासून वाचण्यासाठी या दहा टिप्स 
 
1. पुष्कळ पाणी प्या. पण पाणी पितांना हे लक्षात घ्या की पाणी कुठले आहे, पाणी फ्रीजमधील नसावे आणि स्वच्छ पाणी असावे. 
 
2. घरातून जेव्हापण बाहेर निघाल तेव्हा काहीतरी थोडेसे खाऊन आणि पाणी पिऊन निघा. तसेच सोबत एक पाण्याची बाटली ठेवा.
 
3. घराबाहेर निघतांना टोपी घला व कानांना झाकून ठेवा. तसेच डोळ्यांवर उन्हाचा चश्मा नक्की घाला. 
 
4. प्रत्येक दिवशी नियमित कांदा खा व सोबत ठेवा. 
 
5. उन्हाळ्यात फळे, फळांचा रस, दही, मठ्ठा, ताक, जलजीरा, लस्सी, कैरीचे पन्ह, कैरीचि चटनी, खा. 
 
6. हल्केसे लवकर पचेल असे जेवण करा. 
 
7. नरम, मऊ, सूती कपडे घाला म्हणजे गरमी होणार नाही. 
 
8. एसी मधून लगेच उन्हात जाऊ का व उन्हातून लगेच एसी मध्ये जाऊ नका . 
 
9. तळलेले, मसालेदार पदार्थ सेवन केले तर तुमचे पोट खराब होऊ शकते. 
 
10. यासोबतच वेळोवेळी आवश्यकतानुसार ग्लूकोजचे सेवन करा आणि आपल्या उर्जेचा अनावश्यक उपयोग करू नका.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता,विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती