अनेक गुणांचा खजिना आहे हे इवलेसे बोर.......

सोमवार, 17 फेब्रुवारी 2020 (16:52 IST)
बोर हे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात. चवीला आंबट, गोड, तुरट असणारे हे फळ स्वतःमध्ये अनेक गुणांचे समावेश घेऊन आहे. चला तर मग आपण ह्याचे गुण जाणून घेऊ या..
 
बोराचे गुण आरोग्य लाभ देण्याचे आहे. ह्यात भरपूर प्रमाणात पोषक आणि खनिजे असतात. याने गंभीर किंवा सामान्य रोगांशी लढण्यात ते सक्षम असते. ह्यात सोडियम, कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असून पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी असते. बोर फळाचे गुण पुढील प्रमाणे आहे....
 
1  वजन कमी करण्यात लाभकारी
ज्यांना वजन कमी करावयाचे आहे त्याने बोराचे सेवन करावे. ह्यात कोलेस्टेरॉल कमी असते आणि फायबर, प्रथिने चांगल्या प्रमाणात असतात. जे आपल्याला ऊर्जा देतात. फायबर आणि पोषक तत्त्व भूकेवर नियंत्रण ठेवतात. त्यामुळे आपलं वजनावर पूर्णपणे नियंत्रित राहतं. त्याचबरोबर आपण ऊर्जावान राहतात.
 
2 हृदयासाठी लाभकारी
बोरांमध्ये पोटॅशियम भरपूर असतं आणि सोडियम कमी असतं. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. याने रक्तवाहिन्यांना पुरेशी विश्रांती मिळाल्याने हे हृद्याला संरक्षण देतं. ह्यात एंटीथ्रोजेनिक गुण असतो जो धमन्यांतील चरबीला जमू देत नाही. त्यामुळे हृदय सुरक्षित राहतं.
 
3 रक्तदाबाला नियंत्रित करतं
शरीरात योग्य रक्ताभिसरण झाल्याने प्राणवायू (ऑक्सिजन) चा पुरवठा पुरविला जातो. त्यामुळे शरीरात ऊर्जा प्रवाह वाढतो. यामध्ये लोह आणि फाँस्फोरस चांगल्या प्रमाणात असतात जे लाल रक्त पेशींना तयार करतात. बोरं आपल्यातील रक्त रक्ताभिसरणात सुधारणा करून रक्तदाबाला नियंत्रित करतं. अशा प्रकारे, बोराचे फायदे रक्तदाब आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्यासाठी आहेत.
 
4 रोग प्रतिकारक शक्ती वाढविते
बोरांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि खनिज घटक असतात. हे सर्व घटक शरीरात अँटीऑक्सीडेन्ट म्हणून कार्य करतात. यामुळे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत मिळते. हे घटक मुक्त रॅडिकल्स पासून होणारे आजार जसे - कर्करोग, हृदयरोग, सामान्य आजारांपासून शरीराच्या होणाऱ्या नुकसानापासून रक्षण करतं. कुठल्याही ऍलर्जी साठी बोरं लाभकारी आहे.   
 
5 तणावातून मुक्ती
बोराचे सेवन नियमित केल्याने ताण-तणावांपासून दूर राहण्यास मदत होते तसेच नैराश्य आणि इतर मानसिक समस्येतून मुक्ती मिळून मन शांत आणि स्थिर राहतं.
 
6 पचनसंस्थेसाठी लाभकारी
अपचन, गॅस, बद्धकोष्ठता सारख्या व्याधींपासून ग्रस्त असणाऱ्यांसाठी बोर फळ एक चांगला पर्याय आहे. ह्यात फायबरची मात्रा चांगली असल्याने यात असलेले सॅॅपोनिन आणि ट्राइटरपीनोइड घटक अन्नातून पुरेसे पौष्टिक द्रव्य शोषतात. याने पचनशक्ती वाढविण्यास मदत मिळते. याचे नियमित सेवन केल्याने बद्धकोष्ठता, अपचन, गॅस पोट फुगणे सारख्या समस्यांतून मुक्ती मिळते.  
 
7 केस वाढीसाठी लाभकारी
केसांना सुंदर आणि निरोगी बनविण्यासाठी बोराचे नियमित सेवन केले पाहिजे. केसांसाठी बोर तेलाच्या वापर नियमित केल्याने केसांची वाढ होते आणि केस निरोगी राहतात. 
 
8 निद्रानाशासाठी लाभकारी
ज्यांना निद्रानाशेचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे लाभकारी आहे. बोर फळे आणि त्याच्या बियांमध्ये सॅपोनिन्स आणि पॉलिसेकेराइड्स सारख्या फ्लेव्होनॉइड्सचे प्रमाण चांगले असते. सॅपोनिन्स झोपेची गुणवत्ता वाढविण्यात मदत करतात. बोराचे गुणधर्म संपूर्ण मज्जासंस्थेवर चांगला प्रभाव टाकतात ज्यामुळे चांगली झोप येते. 
 
9 त्वचे साठी लाभकारी
बोर फळात एंटीऑक्‍सीडेंट और अँटी-इंफ्लामेटरी गुण असतात. या गुणधर्मामुळे त्वचेवरील सुरकुत्या, मुरूम, डोळ्याखालील काळे मंडळ या समस्या दूर होतात. खरूच पासून पण संरक्षण होते.  
 
10 मेंदूत होणारे आजारांपासून वाचवते
ह्यात असलेले ग्लुटामेट हे पौष्टिक घटक एक न्यूरोमीटर उत्तेजक म्हणून काम करते. वृद्धत्वात मेंदूच्या पेशींची कार्यक्षमता कमी होऊ लागते त्यामुळे मेंदूचे नुकसान होऊन हृदयविकाराचा झटका, पार्किन्सन, ब्रेन स्ट्रोक सारखे आजार होतात. बोर फळाचे सेवन केल्याने ही शक्यता कमी होऊ शकते. 
 
11 हाडं निरोगी ठेवण्यासाठी लाभकारी
म्हतारपणी हाडं ठिसूळ आणि अशक्त होतात. बोरांचे नियमित सेवन केल्याने आस्टिओपोरॉसिसची समस्या कमी करता येऊ शकते. ह्यात असलेले कॅल्शियम आणि फाँस्फोरस हाडांना बळकट करतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती