कोबी-फ्लॉवरचे सेवन केल्याने रक्तवाहिन्यांचा कठोरपणा कमी होतो

वाढत्या वयासोबत वृद्ध मंडळींमध्ये अनेक शारीरिक समस्या डोके वर काढतात. मात्र हिरव्या पालेदार भाज्यांचे सेवन यातून बाहेर पडण्यास मदत करू शकते. हिरव्या भाज्यामुंळे बुजुर्गांचा अनेक समस्यांतून बचाव होऊ शकतो. हल्लीच झालेल्या एका अध्ययनात असे आढळून आले की, ब्रोकली, कोबी, फ्लॉवर आणि मोड आलेल कडधान्याच्या सेवनामुळे वृद्ध महिलांच्या गळ्यातील रक्तवाहिन्या कठोर होण्यापासून बचाव केला जाऊ शकतो. त्यांच्या सेवनामुळे साहिजकच हृदयविकारांचा धोकाही कमी केला जाऊ शकतो. अशा प्रकारच्या आहाराचे दररोज तीन वा तीनपेक्षा जास्त वेळा सेवन करणे वृद्धांसाठी लाभदायक ठरू शकते. ऑस्ट्रेलियातील वेस्टर्न ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञ लॉरेन ब्लॅकेनहॉर्स्ट यांच्या नेतृत्वाखालील चमूने हे अध्ययन केले असून अशा प्रकारच्या भाज्यांचा हृदयाच्या कॅरोटिड आर्टरी वॉलवर पडणार्‍या प्रभावाचे अध्ययन करून त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे. कॅरोटिड वॉलची जाडीमध्ये 0.1 मिलीमीटर घटीचा संबंध पक्षघात व हृदयविकारांच्या जोखीमींमध्ये 10 ते 18 टक्क्यांच्या घटीसोबत आहे, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. संतुलित जीवनशैली आणि अशा प्रकारच्या भाज्यांचे सेवन हृदयरोगापासून बचाव करण्यातही महत्त्वपूर्ण समजले जाते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती