शनीची अंगठी धारण करण्याचे 9 नियम, जाणून घ्या नाहीतर होऊ शकतं नुकसान

गुरूवार, 19 मार्च 2020 (12:36 IST)
शनी ग्रहासाठी तीन प्रकाराच्या अंगठ्या असतात, पहिली नीलमची अंगठी, दुसरी लोखंडाची अंगठी आणि तिसरी घोड्याच्या नालची अंगठी. लोखंडाच्या अंगठीला शनीची अंगठी देखील म्हटलं जातं. येथे लाल किताबानुसार लोखंडी अंगठी घालण्याचे 10 नियम जाणून घ्या.
 
1. शनीची ढय्या, साडे साती, दशा, महादशा किंवा अंतर्दशा मध्ये सर्व प्रकाराच्या समस्यांपासून बचावासाठी लोखंडी अंगठी घातली जाते. ही अंगठी शनी, राहू आणि केतूच्या दुष्प्रभाव आणि वाईट आत्म्यांपासून बचावासाठी धारण केली जाते.
 
2. लाल किताबानुसार कुंडली बघितल्यानंतरच लोखंडी अंगठी घालावी नाहीतर विपरित प्रभाव पडू शकतो. जसे कुंडलीत सूर्य, शुक्र आणि बुध मुष्टारका असल्यास शुद्ध चांदीची अंगठी योग्य ठरेल. अशात लोखंड घालणे नुकसान करू शकतं.
 
3. कुंडलीत सूर्य, शुक्र आणि बुध मुष्टारका असल्यास शुद्ध चांदीची अंगठी योग्य ठरेल परंतू बुध आणि राहू असल्यास अंगठी जोड नसलेल्या लोखंडाची असावी.
 
4. बुध 12व्या भावात असल्यास किंवा बुध आणि राहू मुष्टारका किंवा वेगवेगळ्या भावात मंद होत असल्यास ही अंगठी शरीरावर धारण केल्याने फायदा होईल, हातात धारण केल्याने नुकसान होईल.
 
5. बारावा भाव किंवा घर राहूचे घर आहे. शुद्ध लोखंडी अंगठी बुध शनी मुष्टारका आहे. जर बुध 12व्या भावात आहेत तर तो 6व्या घरातील सर्व ग्रहांना बरबाद करतं. बुद्धी (बुध) सह हुशारपणा (शनी) चा नंबर 2-12 मिळत असल्यास विषामुळे मरण पावत असणार्‍यांसाठी ही अंगठी अमृत सिद्ध होई. अर्थात भाग्य उजळेल.
 
6. ज्या जातकांच्या कुंडलीत शनी ग्रह उत्तम फळ देत असेल त्यांनी देखील अंगठी घालू नये.
 
7. ही अंगठी उजव्या हाताच्या मध्यम बोटात धारण करावी कारण याच बोटाखाली शनी पर्वत असतं.
 
8. शनिवार संध्याकाळी ही अंगठी धारण करावी. यासाठी पुष्य, अनुराधा, उत्तरा, भाद्रपद आणि रोहिणी नक्षत्र सर्वश्रेष्ठ आहे.
 
9. लाल किताबात सांगितलेल्या स्थितीनुसार ही अंगठी धारण केलेली असल्यास वेळोवेळी अंगठी वाळूवर घासून चमकवत राहावी.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती