Lal kitab astrology 2020 : आपली आयू 34 ते 42 या वयोगटातील असेल तर करा हे 5 उपाय

शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (10:15 IST)
लाल किताबानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वर्षात आपला प्रभाव दाखवतो आणि चांगले-वाईट फळ देतो. आपण 34 ते 43 वयोगटातले असल्यास आपण चांगले यश संपादनासाठी खालील 5 उपाय योजिले पाहिजे.
 
आपल्या वयोगटामध्ये बुध आणि शनी ग्रह प्रभावी असतात. बुध व्यवसायाचा कारक असून शनी इतर गोष्टींशी निगडित आहे. हे दोन्ही ग्रह बिघडल्यास आपणास महत्त्वाच्या गोष्टींपासून लांब ठेवते. त्या साठीची काळजी घेणे महत्त्वाचे असते.
 
हे ग्रह प्रबळ करण्यासाठी काही उपाय सांगितले आहे, ते केल्यास हे दोन्ही ग्रह प्रबळ होऊन चांगली फलश्रुती देतात.
 
सर्वप्रथम बुधासाठी उपाय- 
 
१ कुमारिकांना जेवू घालावे आणि त्यांना हिरव्या रंगाचे वस्त्र दान करावे.
२ दर बुधवारी गायीस हिरवा चारा देऊन अख्खा मूग दान करावे. 
३ दुर्गा देवीची पूजा आराधना करा. मुलगी, बहीण, काकू, मेहुणीशी आदराने वागा.
४ कधीही खोटे बोलू नका. कोणत्याही प्रकाराचे व्यसनांना बळी पडू नका. तोंडावर आवर घाला. 
५ बुध कमकुवत असल्यास नाकात छिद्र पाडून चांदीची तार घालून 43 दिवस ठेवा. 
 
 
शनीसाठी उपाय- 
१ दररोज कावळ्याला पोळी खाऊ घाला.
२ दर शनिवारी सावली दान करा. 
३ मद्यपान करू नका. भैरव देवाची पूजा करावी.
५ दात नेहमी स्वच्छ ठेवा. दिव्यांग तसेच सफाई कामगारांना चांगली वागणूक द्या.
६ शनी खराब असल्यास तीळ, उडीद, लोखंड, तेल, काळे वस्त्र, काळे जोडे दान करा.
 
टीप:- शनी चांगला असल्यास हे दान करू नका.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती