संकष्टी चतुर्थी आणि करवा चौथ, या प्रकारे करा पूजा

संकष्टी चतुर्थी व्रत प्रत्येक महिन्यांत दुसर्‍या पंधरवड्यात वद्य चतुर्थीच्या दिवशी "संकष्टी चतुर्थी" असते. हा श्रीगणपतीच्या उपासनेचा दिवस आहे. दिवसभर उपोषण करुन, रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्रीगणपतीची पूजा करुन, चंद्रदर्शन घेऊन उपोषण सोडावयाचे. अशी या व्रताची पाळ्णूक आहे. तसेच आश्विन महिन्यात येणाण्‍या संकष्टी चतुर्थीला करवा चौथ व्रत देखील केलं जातं. अनेक राज्यांमध्ये हे व्रत सवाष्णींसाठी विशेष मानले गेले आहे. या दिवशी स्त्रियां दिवसभर उपाशी राहून अर्थात निर्जल राहून आपल्या नवर्‍याच्या दिर्घायुष्याची तसंच सुख-समृद्धीची प्रार्थना करते. या दिवशी संध्याकाळी चंद्राची पूजा करुन उपास सोडण्याचा नियम आहे.
 
यंदा 70 वर्षांनंतर शुभ संयोग आल्याचा सांगण्यात आला आहे. या दिवशी गणपतीची चतुर्थी म्हणून व्रत ठेवणार्‍यांनी दिवसभर उपवास करुन संध्याकाळी स्नान करुन चौरंगावर तांदूळची लहानशी रास करावी, त्यावर स्वच्छ पाण्याने भरलेला तांब्या ठेवावा, कलशाभोवती दोन वस्त्रे गुंडाळावी, त्यावर ताम्हन ठेवून त्यात "श्रीसंकष्टहर गणपतीची" स्थापना करावी. अर्थातच गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. त्याची षोडोपचारे पूजा करावी. " संकष्ट चतुर्थी महात्म्य " वाचावे. २१ मोदकांचा नेवैद्य दाखवून आरती करावी. नंतर चन्द्रदर्शन करुन, चंद्राला अर्घ्य, गंध, अक्षता, फुले वाहून त्याची पूजा करावी. नमस्कार करावा. नंतर उपोषण सोडावे. जेवणांत मोदक असावे. जेवण झाल्यानंतर उत्तर पूजा करुन मूर्ती किंवा फोटो उचलून घ्यावे. धान्य वापरात घ्यावे. पाणी तुळशीत ओतावे.
 
तसेच या दिवशी करवा चौथ व्रत करत असलेल्या स्त्रियांनी दिवसभर निर्जल राहून संध्याकाळी स्नान करुन चौरंगावर लाल कपडा घालावा. त्यावर महादेव, देवी पार्वती, कार्तिकेय आणि गपणतीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा. एका तांब्यात पाणी घेऊन त्यावर श्रीफळ ठेवून कलावा बांधावा आणि मातीचा करवा घेऊन त्यात गहू भरुन त्याच्या झाकाणात साखर भरावी, त्यावर दक्षिणा ठेवावी. कुंकाने करव्यावर स्वास्तिक काढावे. नंतर विधीपूर्वक पूजा करावी. पूजा झाल्यावर हातात अक्षता घेऊन कथा करावी. नंतर रात्री चंद्रदर्शन केल्यावर चंद्राची पूजा करुन उपास सोडावा.
 
या दिवशी अपशब्द बोलू नये. 
लहान- मोठ्यांचा सन्मान करावा.
आपल्या व्यवहारात सुधारणा करण्याचा संकल्प घ्यावा.
चंद्र पूजन झाल्यावर वडिलधार्‍यांचा आशीर्वाद घ्यावा.
या दिवशी धारदार वस्तूंपासून लांब राहावे.
स्त्रियांनी या दिवशी पांढर्‍या वस्तू दान करुन नये.
या दिवशी काळ्‍या रंगाचे वस्त्र परिधान करु नये.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती