चतुर्थीला गणपतीची पूजा करण्यापूर्वी हे नक्की बघा

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी उठावे.
स्नान करुन स्वच्छ हलक्या लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे.
लाल रंगाच्या कपड्यावर गणपतीचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करावी.
गणपतीची पूजा करताना मुख पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे.
पूजेत खोबरं- गूळ, लाल दोरा, अक्षता, जास्वंदाचे फुलं, तांब्याच्या लोट्यात पाणी, पंचामृत, धूप, सामुग्री असावी.
गणपतीला पाणी, मग पं‍चामृताने स्नान घालावे. नंतर हळद-कुंकु, गुलाल, शेंदूर, फुलं, अक्षता अर्पित कराव्या. 
दुर्वा जोड अर्पित करावी. 
गूळ-खोबर्‍याचं नैवेद्य दाखवावं.
गणपतीसमोर दिवा लावून लाल गुलाबांच्या फुलांनी गणपतीला सजवावे.
तिळाचे लाडू, केळी किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवावा.
गणपतीसमोर उदबत्ती, धूप, दिवा लावून या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. 'ॐ गणेशाय नम:' किंवा 'ॐ गं गणपतये नम: 
चंद्र उदय झाल्यावर चंद्राला अर्घ्य द्यावं.
चंद्र दर्शन करुन गणपतीची आरती करावी.
नंतर उपास सोडावा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती