Army Public School मध्ये शिक्षकांच्या पदासाठी आठ हजार पदे रिक्त

सोमवार, 5 ऑक्टोबर 2020 (09:36 IST)
आपल्याला शिक्षक व्हायचे असल्यास, आर्मी पब्लिक स्कूल (Army Public School) आपल्याला चांगली संधी देत आहे. देशभरात एकूण 137 आर्मी पब्लिक स्कूल तब्बल 8 हजार शिक्षकांची पदे आहेत. आता या शाळेत शिक्षकांच्या पदांवर भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. या साठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुरु झाली आहे.  
 
या नोकरीसाठी आवश्यक तारखांपासून आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर सर्व माहिती पुढे देण्यात आली आहे.
 
महत्वाच्या तारखा -
अर्ज/ नोंदणीची प्रारंभाची तारीख  -  01 ऑक्टोबर, 2020
अर्ज / नोंदणीची अंतिम तारीख - 20 ऑक्टोबर, 2020
ऑनलाईन प्रवेश पत्र देण्याची तारीख - 04 नोव्हेंबर, 2020 (बदल होऊ शकतो)
परीक्षेची तारीख - 21 आणि 22 नोव्हेंबर, 2020
निकाल जाहीर करण्याची तारीख - 02 डिसेंबर, 2020 (बदल होऊ शकतो)
 
शैक्षणिक पात्रता - 
आर्मी पब्लिक स्कूलमधील शिक्षकांच्या वेगवेगळ्या पदांसाठी स्वतंत्रपणे शैक्षणिक पात्रताही ठरविण्यात आल्या आहेत. मुख्य पात्रतेविषयी माहिती येथे देण्यात आली आहे. 
 
पीजीटी - पदव्युत्तर पदवी आणि बीएड किमान 50% गुणांसह.
टीजीटी - किमान 50% गुणांसह बीएड आणि पदवी असणं आवश्यक आहे.
पीआरटी - किमान 50% गुणांसह पदवी आणि बीएड / दोन वर्षाचा डिप्लोमा असणं आवश्यक.
 
वय मर्यादा - 
फ्रेशरसाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्षे निश्चित केली आहे. त्याच बरोबर अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी वयाची कमाल मर्यादा 57 वर्षे निश्चित केली आहे.
 
अर्ज कसा करावा -
इच्छुक आणि पात्र उमेदवार 20 ऑक्टोबर, 2020 च्या संध्याकाळी 5 वाजे पर्यंत किंवा त्यापूर्वीच आर्मी वेलफेयर एज्युकेशन सोसायटीच्या अधिकृत संकेतस्थळा www.awesindia.com च्या माध्यमातून शिक्षक पदांसाठी अर्ज करू शकता. अर्ज फी 500 रुपये आहेत. 
 
निवड प्रक्रिया - 
उमेदवारांची निवड ऑनलाइन स्क्रिनींग टेस्ट, मुलखात आणि अध्यापन कौशल्याच्या मूल्याकंनच्या आधारे केली जाईल. 

शिक्षकांच्या एकूण पदांची नेमणूक येथे करण्यात येणार आहे, याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. असे सांगण्यात आले आहेत की रिक्त जागांविषयीची संपूर्ण माहिती मुलाखत आणि मूल्याकंन परीक्षेच्या वेळापत्रकांसह विविध आर्मी पब्लिक स्कूल कडून जाहीर करण्यात येईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती