सरकारी नोकरी : मध्यप्रदेशातील 'व्यापम' मधील अनेक पदांवर भरती त्वरित अर्ज करा

शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020 (09:38 IST)
MPPEB (VYAPAM) Recruitment 2020: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. भोपाळच्या (प्रोफेशनल एग्जामिनेशन बोर्ड,) व्यावसायिक परीक्षा मंडळाने उप अभियंता भरती परीक्षा -2020 साठी अर्ज मागितले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार ज्यांना या पदासाठी अर्ज करायचे आहे, ते परीक्षांच्या मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 28 सप्टेंबर 2020 पासून सुरु झाली आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांवर नोकरीशी निगडित सर्व माहिती जसे की आवश्यक पात्रता, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करावा, पदांचा तपशील इत्यादी माहिती-
 
महत्वाचा तारख्या :
अर्ज भरण्यासाठीची प्रारंभची तारीख - 28 सप्टेंबर 2020 
अर्ज फॉर्ममध्ये सुधारणा करण्याची प्रारंभिक तारीखः 28 सप्टेंबर 2020
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 12 ऑक्टोबर 2020
अर्ज फॉर्ममध्ये सुधारणा करण्याची अंतिम तारीखः 17 ऑक्टोबर 2020
परीक्षेची तारीख: 09 आणि 10 डिसेंबर 2020
 
परीक्षा शुल्क -
अनारक्षित उमेदवारांसाठी 500 रुपये 
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, अपंग उमेदवारांसाठी (मध्य प्रदेशातील मूळ रहिवाशांसाठी) 250 रुपये
 
वय मर्यादा - 
या पदांवरील उमेदवारांचे किमान वय 18 वर्ष आणि कमाल वय 40 वर्ष निश्चित केले गेले आहे. या संदर्भात सविस्तार माहितीसाठी खालील दिलेल्या सूचना लिंकवर क्लिक करून वाचू शकता.
 
शैक्षणिक पात्रता - 
या पदांसाठी अर्ज करण्यासाठीची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आहे. या शिवाय संबंधित क्षेत्रात डिप्लोमा असणे बंधनकारक आहे.
 
अर्ज असा करावा - 
या परीक्षेत बसण्यासाठी उमेदवारांना भोपाळच्या व्यावसायिक परीक्षा मंडळाच्या अधिकृत संकेत स्थळांवर http://peb.mp.gov.in/ किंवा या बातमीमध्ये पुढील सूचना वाचावी. सांगू इच्छितो आहोत की अर्ज ऑनलाईन माध्यमाद्वारेच केले जातील, तसेच एका निर्दिष्ट वेळेत केलेले अर्जच वैद्य असतील.
 
नोकरीचे स्थळ - भोपाळ मध्यप्रदेश 
 
परीक्षा ठिकाण -भोपाळ, इंदोर, जबलपूर, उज्जैन, नीमच, रतलाम, मंदसौर, सागर, सतना, खंडवा, गुना, दमोह, सीधी, छिंदवाडा आणि बालाघाट.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती